KKR चा फलंदाज राहुल त्रिपाठीवर पुणे पोलिसांची कारवाई, दंडही ठोठावला!
पुण्यात मास्क न घालता प्रवास करणाऱ्या कोलकाता नाईट राईडर्सचा खेळाडू राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केलीय. (Pune Police Action Against KKR Player Rahul Tripathi For Not Wearing Mask)
पुणे : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मास्क घालणं सगळ्यांनाच सक्तीचं करण्यात आलंय. जर मास्क घातला नाही तर प्रशासन कारवाई करत आहे. पुण्यात मास्क न घालता प्रवास करणाऱ्या कोलकाता नाईट राईडर्सचा खेळाडू राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केलीय. राहुल त्रिपाठीला पुणे पोलिसांनी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Pune Police Action Against KKR Player Rahul Tripathi For Not Wearing Mask)
राहुल त्रिपाठीवर पुणे पोलिसांची कारवाई
पु्ण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकात पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. राहुल त्रिपाठी एका कारमधून कात्रज-कोंढवा रस्त्यावर फिरत होता. तेव्हा त्याच्या तोंडाला मास्क नव्हतं. पोलिसांनी लगोलग त्याच्यावर कारवाई केली तसंच आर्थिक दंडही ठोठावला.
राहुल त्रिपाठीला ठोठावला 500 रुपये दंड
“कोंढवा खडी मशीन चौकात दुपारच्या सुमारास पोलिस विनामास्क नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी एका चार चाकी कारमधून एक व्यक्ती विनामास्क प्रवास करतो आहे, हे आम्हाला दिसलं. त्याला आम्ही अडवलं. त्याला त्याची चूक दाखवून दिली. लागलीच त्याने 500 रुपये दंडाची रक्कम भरली”, असं कारवाई केलेले पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनावणे यांनी सांगितलं.
राहुल त्रिपाठी KKR चा महत्त्वाचा शिलेदार
आयपीएलमधील कोलकाता नाईट संघातील राहुल त्रिपाठी हा महत्त्वाचा शिलेदार मानला जातो. सध्या आयपीएलच्या मैदानावर कोरोना व्हायरसने एन्ट्री केल्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे राहुल त्रिपाठी सध्या पुण्यातच आहे.
विनामास्क नागरिकांवर कारवाईचा बडगा
महाराष्ट्रातल्या विविध भागांत मास्क न परिधान केल्याने नागरिकांर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नगर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या आणि अशा महत्त्वांच्या शहरांतून नागरिकांनी मास्क न घातल्याने हजारो रुपयांची दंडाची रक्कम वसूल केली जात आहे.
(Pune Police Action Against KKR Player Rahul Tripathi For Not Wearing Mask)
हे ही वाचा :
भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य
‘बाहुबली रिषभ पंत’, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसोबत काय करतोय?
मुरलीधरनचा कसोटी क्रिकेटमधला 800 विकेट्सचा रेकॉर्ड अश्विन तोडू शकतो, या दिग्गजाची भविष्यवाणी