Shreyas Iyer : 18 कोटीला विकत घेतलेल्या चहलला श्रेयस अय्यरने फक्त एकच ओव्हरच का दिली? त्यामागे हे कारण

Shreyas Iyer : युजवेंद्र चहल IPL इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. पंजाब किंग्सने त्याला विकत घेण्यासाठी 18 कोटी रुपये मोजले आहेत. कालच्या सीएसके विरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त एकच ओव्हर टाकली. श्रेयस अय्यरने असा निर्णय का घेतला? त्या मागच कारण सांगितलं आहे.

Shreyas Iyer : 18 कोटीला विकत घेतलेल्या चहलला श्रेयस अय्यरने फक्त एकच ओव्हरच का दिली? त्यामागे हे कारण
shreyas iyer-yuzvendra chahal
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 09, 2025 | 8:37 AM

पंजाब किंग्सच्या नव्या होम ग्राऊंडवर काल CSK विरुद्ध सामना झाला. पंजाब किंग्सने ही मॅच 18 धावांनी जिंकली. या विजयानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, चहलला फक्त एक ओव्हर गोलंदाजी का दिली? पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरने चहलकडून संपूर्ण चार षटक गोलंदाजी करुन घेतली नाही. या प्रश्नाच उत्तर श्रेयस अय्यरने स्वत:हा दिलं. अय्यरला या बद्दल सामन्यानंतर विचारण्यात आलं, त्यावेळी तो म्हणाला की, हा विचारपूर्वक आखण्यात आलेल्या रणनितीचा भाग होता. चहलकडून संपूर्ण चार षटकं गोलंदाजी करुन न घेण्याच्या अय्यरच्या निर्णयाच आता कौतुक होत आहे.

सर्वात आधी जाणून घ्या चहलने गोलंदाजी का नाही केली? पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरनुसार हा त्याचा रणनितीक निर्णय होता. कारण शिवम दुबे आणि कॉनवे क्रीजवर होते. मिडल ओव्हर्समध्ये दोघे काही चेंडू खेळले होते. अशावेळी चहलला गोलंदाजीला आणलं असतं, तर दुबे आणि कॉनवेने त्याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला असता, असं अय्यरने सांगितलं. अय्यरच्या मते चहल एक स्मार्ट बॉलर आहे, यात कुठलीही शंका नाही. माझ्या आतून मला आवाज आला की, वेगवान गोलंदाजीच कायम ठेवं. मी तेच केलं. पेसर्सच्या स्लोअर चेंडूंनी काम केलं, असं अय्यर म्हणाला.

हा निर्णय मास्टर स्ट्रोक का?

युजवेंद्र चहल IPL इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. पंजाब किंग्सने त्याला विकत घेण्यासाठी 18 कोटी रुपये मोजले आहेत. फक्त त्याने एक ओव्हर टाकली. 17 वी ओव्हर टाकताना चहलने फक्त 9 धावा दिल्या. चहलकडून गोलंदाजी न करुन घेण्याच्या श्रेयस अय्यरचा निर्णय मास्टर स्ट्रोक होता, असं दिग्गज क्रिकेटर हुनमा विहारीने म्हटलं आहे.


पंजाबचा कितवा विजय?

अय्यरच्या नेतृत्वाच त्याने कौतुक केलं. तुमच्या भात्यात किती आणि कसे बाण आहेत, हे महत्त्वाच नाही, तुम्ही त्यांचा कसा वापर करता हे महत्त्वाच आहे, असं हनुमा विहारी म्हणाले. श्रेयस अय्यरने सुद्धा तेच केलं. 18 कोटी ही मोठी रक्कम आणि यशस्वी गोलंदाज या टॅगकडे दुर्लक्ष करुन संघाच्या हिताचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला हरवून IPL 2025 मध्ये तिसरा विजय मिळवला. पंजाबने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत.