R Praggnanandhaa: आर प्रज्ञानानंदने पॅरासिन ओपन ‘ए’ बुद्धिबळ स्पर्धा पटकावली; अलेक्झांडर प्रेडकेला मागे टाकले
आगामी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत असलेल्या प्रज्ञानानंदने महिला ग्रँडमास्टर श्रीजा शेषाद्री, लाचाझेर योर्डानोव (बल्गेरिया), काझीबेक नोगेरबेक (कझाकस्तान), देशबांधव कौस्तव चॅटर्जी, आर्यस्तानबेक उराजेव (आर्यस्तानबेक उराजेव) या महिलांचा सलग सहा वेळी पराजय करुन विजय मिळवत पदार्पण केले आहे.
मुंबईः आर. प्रज्ञानानंदने पॅरासिन ओपन ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद 2022 जिंकले असून आर. प्रज्ञानानंदने साडेसात गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अलेक्झांडर प्रेडकेला मागे टाकले आहे. बुद्धीबळाच्या पटलावर सध्या भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदची दमदार कामगिरी सुरूच आहे. प्रज्ञानानंदने शनिवारी पॅरासिन ओपन ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धेचे 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. या 16 वर्षीय खेळाडूने नऊ फेऱ्यांमध्ये 8 गुण मिळवले असून न हरता त्याने या स्पर्धेत अर्ध्या गुणांच्या आघाडीने स्पर्धा जिंकली आहे.
Indian Grandmaster R Praggnanandhaa wins Paracin Open ‘A’ chess tournament 2022
(File pic) pic.twitter.com/onlDEaRbns
— ANI (@ANI) July 16, 2022
प्रेडके द्वितीय क्रमांकावर
या स्पर्धेत अलेक्झांडर प्रेडकेने 7.5 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. अलीशेर सुलेमेनोव्ह आणि भारताच्या एएल मुथय्या यांनी सात गुणांची भागीदारी केली होती परंतु कझाकस्तानचा सुलेमेनोव्ह टायब्रेकच्या चांगल्या गुणांमुळे त्याने तिसरे स्थान मिळवले. भारताचा युवा आंतरराष्ट्रीय मास्टर व्ही .प्रणवची मोहीम अंतिम फेरीत प्रेडकेकडून पराभूत झाल्यानंतर 6.5 गुणांसह संपुष्टात आली, तर ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण (6.5 गुण) हा सातव्या स्थानावर आहे.
सातव्या फेरीत बरोबरीत रोखले
आगामी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत असलेल्या प्रज्ञानानंदने महिला ग्रँडमास्टर श्रीजा शेषाद्री, लाचाझेर योर्डानोव (बल्गेरिया), काझीबेक नोगेरबेक (कझाकस्तान), देशबांधव कौस्तव चॅटर्जी, आर्यस्तानबेक उराजेव (आर्यस्तानबेक उराजेव) या महिलांचा सलग सहा वेळी पराजय करुन विजय मिळवत पदार्पण केले आहे. प्रेडकेने त्यांना सातव्या फेरीत बरोबरीत रोखले. त्यानंतर आठव्या फेरीत त्याने अर्जुन कल्याणला पराभूत करुन त्यानंतर नवव्या फेरीत सुलेमेनोव्हशी सामना बरोबरीत सोडवला.
2018 मध्ये ग्रँडमास्टर
चेन्नईचा रहिवासी असलेल्या प्रज्ञानानंदने 2018 मध्ये प्रतिष्ठित ग्रँडमास्टरचे विजेतेपद मिळवले होते. ही कामगिरी करणारा प्रज्ञानंद हा भारतातील सर्वात तरुण खेळाडू होता आणि त्यावेळी जगातील तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू होता. भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने या खेळाडूला मार्गदर्शन केले आहे. प्रज्ञानंदला क्रिकेट आवडते आणि त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो मॅच खेळायला जात असल्याचे सांगितले.