Rahul Dravid : चँपियन बनल्यावरही टीम इंडियाचे प्रशिक्षक नाहीत खुश ? जाता-जाता राहुल द्रविडने विराट कोहलीला दिलं पुढलं मिशन
टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसह सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. टी20 वर्ल्ड कप तर संपलाच पण त्यासोबतच राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कालावधीदेखील संपला आहे. मात्र जाता जात द्रविडने कोहलीला पुढलं मिशन दिलं आहे.

टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील रोमहर्षक लढीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत वर्ल्डकपवर नाव कोरलं आणि संपूर्ण भारतात जल्लोष झाला. मेन इन ब्लूचे हे दुसरे टी20 वर्ल्डकप विजेतेपद आहे. याआधी भारतीय संघाने 2007 मध्ये टी20 वर्ल्डकप ट्रॉफी जिंकली होती. तब्बल १७ वर्षांनी, शनिवारी ( 2024 ) भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टी20 वर्ल्डकप जिंकला. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा हा अखेरचा सामना होता. मात्र त्यांच्या विजयाची भूक इथपर्यंतच नाही तर त्यांनी पुढचे लक्ष्यही आखले आहे. संघाचा संघाचा निरोप घेण्यापूर्वी प्रशिक्षक राहुल निरोप घेण्यापूर्वी राहुल द्रविड यांनी विराट कोहलीली पुढचे मिशनही दिले आहे.
राहुल यांनी कोहलीला सांगितलं की पांढऱ्या चेंडूसमोरचे सर्व बॉक्स टिक केले आहेत. आता लाल चेंडूसमोरील बॉक्स टीक करणं बाकी आहे. ते टीक कर. दोघांचा हे बोलणं नेमकं कशाबद्दल होतं असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल. तर द्रविडच्या बोलण्याचा अर्थ काय ते जाणून घेऊया. विराट कोहलीने 2011 मधील वनडे वर्ल्ड कप, 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता 2024 मधील टी-20 वर्ल्डकप यासह आयसीसीच्या सर्व व्हाईट बॉल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता विराटला केवळ रेड बॉल ट्रॉफी म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकायची आहे. त्याबद्दलंच त्यांचं हे संभाषण होतं.




टीम इंडिया दोनदा पोहोचली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आतापर्यंत दोन आवृत्त्या खेळवण्यात आल्या आहेत. दोन्ही वेळा फायनलमध्ये टीम इंडिया पोहोचली. मात्र, दोन्ही वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला. 2021 मध्ये पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. तर 2023 मध्ये दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळला गेला, तेव्हा भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. आता 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडिया पोहोचू शकते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
“All three white ticked off, one red to go…tick it ” pic.twitter.com/0MLAcGgYyo
— Gaurav (@Melbourne__82) June 30, 2024
विराट, रोहित आणि जडेजाने T20 इंटरनॅशनमधून घेतली निवृत्ती
2024 चा टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तिन्ही खेळाडूंनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सामन्यानंतर सर्वात आधी कोहलीने निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. चॅम्पियन बनल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजानेही टी20 इंटरनॅशनलला अलविदा केला.
दरम्यान टी20 वर्ल्डकप जिंकल्यावर टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव झालाय. बीसीसीआयने भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआय 125 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत ही घोषणा केली