भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका कोण जिंकणार?, राहुल द्रविडची आतापर्यंतची सर्वांत मोठी भविष्यवाणी

राहुल द्रविडच्या मते "इंग्लंडच्या भूमीत भारताचा डंका वाजेल. 5 सामन्यांची कसोटी मालिका भारत 3-2 ने जिंकेल. 2007 नंतर ब्रिटनमध्ये जिंकण्याची भारताला नामी संधी असेल, असं राहुल द्रविडने म्हटलंय. (Rahul Dravid Guess Who will win the Test series between India and England)

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका कोण जिंकणार?, राहुल द्रविडची आतापर्यंतची सर्वांत मोठी भविष्यवाणी
राहुल द्रविड
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 10:15 AM

मुंबईटीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) आणि त्यानंतर कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर (India Tour England 2021) जाणार आहे. विराटसेना 18-22 जूनदरम्यान न्यूझीलंड विरुद्ध विजेतेपदासाठी भिडणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही हायप्रोफाईल कसोटी मालिका होण्यापूर्वीच भारतीय संघाचा माजीज कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविडने (Rahul Dravid) विजेत्या संघाचं नाव घोषिक तेलं आहे. (Rahul Dravid Guess Who will win the Test series between India and England)

इंग्लंडमध्ये भारताचा डंका वाजणार, द्रविडची भविष्यवाणी

4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. ही कसोटी मालिका अत्यंत उत्कंठावर्धक अशी असेल. राहुल द्रविडच्या मते “इंग्लंडच्या भूमीत भारताचा डंका वाजेल. 5 सामन्यांची कसोटी मालिका भारत 3-2 ने जिंकेल. 2007 नंतर ब्रिटनमध्ये जिंकण्याची भारताला नामी संधी असेल, असं राहुल द्रविडने म्हटलं आहे.

भारताला इंग्लंडला पराभूत करण्याची सुवर्णसंधी

“इंग्लंडला त्यांच्यात भूमीत नमवणारा द्रविड भारताचा शेवटचा कर्णधार ठरला. त्यानंतर कुठल्याही कर्णधाराला अशी कामगिरी जमली नाही. आता विराट सेनेला इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पाणी पाजण्याची नामी संधी असेल. रवीचंद्रन अश्विन विरुद्ध बेन स्टोक्स ही लढाई मालिकेची अधिक शोभा वाढवणारी असेल”, असं द्रविड म्हणाला.

जो रुट आणि बेन स्टोक्स इंग्लंडच्या पाठीचा कणा

“इंग्लंडकडे सर्वश्रेष्ठ बोलर्स आहेत. त्यांच्याकडे बोलिंगमध्ये अनेक पर्याय आहेत. बॅटिंगबाबत बोलायचं झालं तर पहिल्या सहा बॅट्समनमध्ये जो रुट आणि बेन स्टोक्स यांच्यावर इंग्लंडची टीम खूप अवलंबून असेल. किंबहुना जो रुट आणि बेन स्टोक्स इंग्लंडच्या पाठीचा कणा आहेत”, असं राहुल द्रविड म्हणाला.

भारत 3-2 ने इंग्लंडला पराभूत करेल

“ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत पराभूत केल्यानंतर भारतीय संघाजवळ इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीत त्यांना आस्ंमान दाखवण्याची सुवर्णसंधी आहे. भारत इंग्लंड दौऱ्यासाठी उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने खेळाडूंमध्ये आत्मविश्वास असेल. संघातील काही खेळाडू याअगोदर इंग्लंडमध्ये खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ तिथे खेळण्याचा अनुभव आहे. दुसरीकडे भारताजवळ खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मला वाटतं भारत ही मालिका 3-2 ने जिंकेल”, असं द्रविड म्हणाला.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट आवश्यक)

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

Rahul Dravid Guess Who will win the Test series between India and England

हे ही वाचा :

प्रिती झिंटासोबत असलेला क्रिकेटपटू कोण?, फोटो शेअर करताना ‘कमाल’ कॅप्शन, नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा!

20 व्या वर्षी पदार्पण, पहिल्या कसोटीत ठोकल्या 95 धावा, 21 वर्षी करिअर संपलं, ‘तो’ कमनशिबी क्रिकेट कोण?

Video : चहलची बायको धनश्रीच्या आईचा Mothers Day ला श्रद्धा कपूरच्या गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.