India vs Bangladesh : टीम इंडिया बांग्लादेश मॅचमध्ये पाऊस ‘खलनायक’ ठरण्याची शक्यता
झिम्बाम्बे आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध टीम इंडियाला विजय मिळवणं तितकं अवघड नाही.
मेलबर्न : आज टीम इंडियाची (Team India) बांगलादेशविरुद्ध (Bangladesh)चौथी मॅच होणार आहे. पण आजच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये समजा पावसाने खलनायकाची भूमिका बजावली, तर टीम इंडियाचं सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं गणित बिघडणार आहे. आतापर्यंत टीम इंडियाने विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.
एडिलेड या मैदानात आज मॅच होणार आहे. पण तिथं ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याने आज पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तीन मॅच पैकी दोन मॅच टीम इंडियाने जिंकल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी आजचा विजय महत्त्वाचा आहे.
झिम्बाम्बे आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध टीम इंडियाला विजय मिळवणं तितकं अवघड नाही. त्यामुळे आज समजा मैदानात पाऊस आला तर तो टीम इंडियासाठी खलनायक असेल.
टीम इंडिया
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
बांगलादेश टीम
शकीब अल हसन, नुरुल हसन, अफिफ हुसेन, इबादत हुसेन, हसन महमूद, लिटन दास, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, नजमुल हुसेन शांतो, शॉरीफुल इस्लाम, सौम्या सरकार, मोसादिक होसेन, नसुम अहमद, तस्किन अहमद, यासिर अली चौधरी.