IND vs SA 1st ODI : पहिल्या वनडे सामन्यात पावसाचं सावटं, जाणून घ्या हवामान अंदाज
आजच्या सामन्यात टीम इंडियाची जबाबदारी शिखर धवनला देण्यात आली आहे. उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे.

टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलिया (Australia) आणि आफ्रिकेच्या (Africa) विरुद्धच्या मालिकेमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंची स्तुती सुरु झाली आहे. आज आफ्रिकेविरुद्ध पहिली वनडे मॅच लखनऊमध्ये होणार आहे. तिथं आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आजच्या सामन्यात टीम इंडियाची जबाबदारी शिखर धवनला देण्यात आली आहे. उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. आजच्या सामन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
समजा मैदानावर जोरदार पाऊस झाला, तर तीस मिनिटामध्ये पाणी बाहेर काढण्याची क्षमता असल्याची माहिती एका वेबसाईटने जाहीर केली आहे.



एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही टीम
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, जेनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, एंडिले फेहलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, रैसोबाबायो, ड्वेन प्रेटोरियस शम्सी
भारत: शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद. सिराज, दीपक चहर