IND vs NZ: नेपियरमध्ये पावसाला सुरुवात, पहिल्या सामन्याप्रमाणे चाहत्यांचा मूड खराब होईल का ?
पहिल्या सामन्याप्रमाणे चाहत्यांचा मूड खराब होईल का ?
मुंबई : टीम इंडिया (IND) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात आज तिसरा T20 सामना नेपियरमध्ये (Napier) होणार आहे. पहिला सामना पावासामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला, आज तिसरा सामना दुपारी बारा वाजता सुरु होणार आहे. हवामान खात्याने (Napier Weather Update) तिथं आज पावसाची शक्यता व्यक्त केली नव्हती. परंतु अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे चाहत्यांची तारांबळ उडाली आहे. आज सामना होईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
टीम इंडियाने T20 मालिकेत आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात न्यूझिलंड टीम जिंकली तर मालिकेत बरोबरी होईल. समजा आज टीम इंडिया जिंकली तर टीम इंडिया मालिका जिंकेल. त्यानंतर टीम इंडिया एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्या टीमचं कर्णधारपदं शिखर धवनकडे देण्यात आलं आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने झालेल्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग केली, तसेच शतक झळकावलं. त्यामुळे जगभरातील चाहते त्याची चर्चा करीत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून तो टीमसाठी सतत धावा करीत आहे. हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
भारताचा संभाव्य संघ:
इशान किशन, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.
न्यूझीलंडचा संभाव्य संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे , मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन.