‘तो’ शर्यत जिंकणारच होता पण लाईफने दगा दिला; कोल्हापूरच्या धावपटूसोबत असं झालं तरी काय?

मॅरेथॉन स्पर्धेत राज धावत असताना अचानक भोवळ येऊन तो जमीनीवर कोसळा.

'तो' शर्यत जिंकणारच होता पण लाईफने दगा दिला; कोल्हापूरच्या धावपटूसोबत असं झालं तरी काय?
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 6:52 PM

सातारा : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness Book of World Records) जिंकणाऱ्या धावपटूचा मॅरेथॉन( marathon) स्पर्धा सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. तो शर्यत जिंकणारच होता पण त्या आधीच त्याला मृत्यूने गाठले. मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला. राज क्रांतीलाल पटेल(Raj Patel) असे मृत धावपटूचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राज सहभागी झाला होता. राज हा कोल्हापूरमधील राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. राज याने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव पटकावले आहे.

दरम्यान, राजचा मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा होऊ शकला नाही. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पटेल याच्यासह तीन धावपटूही जखमी झाले आहेत.

या मॅरेथॉन स्पर्धेत सात हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. मॅरेथॉन स्पर्धेत राज धावत असताना अचानक भोवळ येऊन तो जमीनीवर कोसळा. त्यांच्यासोबत धावत असलेल्या धावपटुंनी उचलून त्याला बाजूला घेतला. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

यंदा प्रचंड मोठ्या संख्येत सातारा मॅरेथॉन पार पडली. धावण्याच्या रस्त्यावर आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तैनात ठेवण्यात आल्या होत्या. राज पटेल पुर्ण अंतर पार करून आल्यावर नंतर अवघे 100 मीटर अंतर बाकी असताना तो जमीनीवर कोसळला.

यानंतर तातडीने त्याला मॅरेथॉनचे मेडिकल पार्टनर असलेल्या यशवंत हॉस्पिटलला हलवले. मात्र त्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.