IPL चा सर्व पैसा खर्च करण्याची तयारी, तरीही पित्याला वाचवण्यात अपयश, युवा क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर
चेतन साकरियाने IPL मधून मिळालेला सगळा पैसा खर्च वडिलांच्या उपचारावर खर्च करण्यायी तयारी दाखवली होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं होतं. चेतनला वडिलांना वाचवण्यात अपयश आलंय. वडिलांच्या जाण्याने चेतनवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. (Chetan Sakariya father passes away Due to Corona 19)
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया (Chetan Sakariya) याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालंय. गुजरातच्या भावनगरमधील एका खाजगी रुग्णायलयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून ते कोरोनाविरुद्धची लढाई लढत होते. मात्र आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने चेतनवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. (Rajasthan Royals bowler Chetan Sakariya father passes away Due to Corona 19)
चेतनच्या वडिलांचं कोरोनाने निधन
चेतन साकरियाने आयपीएलमधून मिळालेला सगळा पैसा खर्च वडिलांच्या उपचारावर खर्च करण्यायी तयारी दाखवली होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं होतं. चेतनला वडिलांना वाचवण्यात अपयश आलंय. वडिलांच्या जाण्याने चेतनवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
चेतन साकरिया याचे वडील कांजीभाई साकरिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना भावनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहिले काही दिवस त्यांनी उपचारांना योग्य प्रतिसाद दिला. मात्र नंतर त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर आज दुपारी त्यांना कोरोनाने हिरावून नेलंय.
काही दिवसांपूर्वी भावाची आत्महत्या, चेतनवर दु:खाचा डोंगर
काही दिवसांपूर्वी चेतन साकरियाच्या भावाने आत्महत्या केली. आज वडिलांना कोरोनाने हिरावून नेलं. 22 वर्षीय चेतनवर दुहेरी डोंगर कोसळलाय. भावाच्या निधनानंतर चेतनला जबर धक्का बसला होता. पुढचे काही दिवस चेतनला काहीही सुचत नव्हतं. मात्र महिन्याभरानंतर चेतनने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यंदाच्या सिझनमध्ये चेतनने राजस्थानकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. आयपीएल खेळल्यानंतर कुटुंबाला चांगले दिवस पाहायला मिळतील, अशी आशा असतानाच आज चेतनच्या वडिलांचा कोरोनाने बळी घेतला.
चेतन IPL मधून मिळालेले सगळे पैसे वडिलांसाठी खर्च करणार होता
चेतन साकरियाने आठवड्याभरापूर्वी इंडियन एक्सप्रेसला मुलाखती दिली होती. त्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला होता, “काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून माझ्या वाट्याचे पैसे मिळालेत. मी ते पैसे घरी ट्रान्सफर केले आहेत. वडील कोरोनाविरोधी लढाई लढतायेत. अशा मुश्किल परिस्थितीत ते पैसे माझ्या कुटुंबाच्या कामी येतील. जेणेकरुन माझ्या वडिलांवर मी चांगले उपचार करु शकेन.”
चेतनचा गरिबीशी संघर्ष
डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया साधारण कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन आला आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे वडील टेम्पोचालक होते. तर पाच वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्या घरात टीव्हीदेखील नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु त्याच्या चुलत्याने त्याला त्यांच्या दुकानात काम करायला सांगितले आणि त्याच्या शिक्षण आणि खेळाचा खर्च उचलला. आता चेतनने आयपीएल खेळून कुटुंबाचं नशीब उजळवलं.
आयपीएलमध्ये पदार्पण
चेतन साकरियाने यंदाच्या साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच त्याने चमकदार कामगिरी केली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 3 फलंदाजांना बाद करुन धडाकेबाज एन्ट्री केली. राजस्थानने खेळलेल्या सहा सामन्यांत त्याने उत्तम गोलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सने फेब्रुवारीत झालेल्या लिलावात 1.20 कोटी रुपयांत चेतनला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं होतं.
Rajasthan Royals bowler Chetan Sakariya father passes away Due to Corona 19
हे ही वाचा :
कोरोनाबाधित वडिलांवर आयपीएलचा सगळा पैसा खर्च करणार, 22 वर्षीय चेतन साकरियाच्या संघर्षाची कथा!
नशेसी चढ गयी… मालदीव्जमध्ये मध्यरात्री धिंगाणा, दारुच्या नशेत वॉर्नर-स्लेटरमध्ये धक्काबुक्की?
‘ओरिजनल फिनिशर कोण?’, बेवनच्या वाढदिवशी आयसीसीने थेट धोनीला ट्रोल केलं, फॅन्स भडकले!