रणवीरच्या ’83’ चा फर्स्ट लुक प्रदर्शित

अभिनेता रणवीर सिंहचा आज 34 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसा निमित्ताने सोशल मीडियावर रणवीरने '83' चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे.

रणवीरच्या '83' चा फर्स्ट लुक प्रदर्शित
Follow us
| Updated on: Jul 06, 2019 | 12:42 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंहचा आज 34 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसा निमित्ताने सोशल मीडियावर रणवीरने ’83’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. या फर्स्ट लुकमध्ये रणवीर सिंहचा लुक हुबेहूब दिग्गज खेळाडू कपील देव यांच्यासारखा मिळता जुळता आहे. या फोटोमध्ये रणवीरला तुम्ही कपील देव यांच्या भूमिकेत पाहू शकता. त्याच्या डोळ्यात कपील देव यांच्यासारखाच जोश दिसत आहे.

रणवीर सिंहचा हा चित्रपट 83 विश्वचषक क्रिकेट सामन्यावर (1983) आधारित आहे.  सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण दोघही इंग्लंडमध्ये आहेत. दीपिका चित्रपटात कपील देव यांची पत्नी भाटिया यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

कहीदिवसांपूर्वी रणवीरने  क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यापूर्वी रणवीर सिंह दिल्ली येथे कपील सिंह यांच्या घरी दहा दिवस राहिला होता. कपील देव यांच्या स्किल्स आणि वैयक्तिक जीवनातील माहिती मिळवण्यासाठी तसेच विश्वचषकातील अनुभव जाणून घेण्यासाठी रणवीरने कपील यांच्या घरी मुक्काम केला होता.

83 चित्रपट विश्वचषक 1983 च्या विजयावर आधारित आहे. यामध्ये हरयाणाचा मुलगा म्हणजे क्रिकेटर कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळलेल्या संघाची कथा या चित्रपटात आहे. या संघाने 1983 मध्ये लंडनच्या लॉर्ड्स स्टेडिअममध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. चित्रपटात रणवीर सिंहला कपील देव यांच्या भूमिकेत तयार करण्यासाठी चित्रपटाची टीम आणि माजी क्रिकेटर बलविंदर सिंह यांनी प्रशिक्षण दिले आहे. यासाठी धर्मशाळेत एक वर्कशॉप आयोजन करण्यात आला होता. ज्यामध्ये सर्व कलाकारांनी कपिल देव, मोहिंदर अमरनाथ आणि इतरांकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले.

चित्रपटाचे प्रोडक्शन कबीर खान आणि दीपिका पादुकोण करत आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.