IND vs NZ: राहुल द्रविडने न्यूझीलंड दौऱ्यासाठी ब्रेक घेतल्याने रवी शास्त्री संतापले, अश्विनने दिलं भन्नाट उत्तर
रवी शास्त्री यांना अश्विनने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा, पाहा काय म्हणाला...
मुंबई : विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) संपल्यापासून टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंवर अनेकांनी टीका केली आहे. त्याचबरोबर चाहत्यांनी वरिष्ठ आणि खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तात्काळ टीमच्या बाहेर काढावे अशी मागणी बीसीसीआयकडे (BCCI) केली होती. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविडने (Rahul Dravid) न्यूझिलंड दौऱ्यासाठी ब्रेक घेतल्यामुळे रवी शास्त्री चांगलेचं संतापल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज अश्विनने युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शास्त्रींना भन्नाट उत्तर दिले आहे.
टीम इंडियासोबत न्यूझिलंडच्या दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण यांना प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. “राहूल द्रविड आणि त्यांच्या टीमने विश्वचषक स्पर्धेसाठी अधिक मेहनत घेतली आहे. मी हे सांगू शकतो, कारण मी हे सगळं खूप जवळून पाहिलं आहे. राहूल द्रविड यांच्याकडे प्रत्येक टीमसाठी नवीन प्लॅन तयार होता. शारिरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टीसाठी द्रविडने अधिक उर्जा खर्च केली आहे. अशावेळी द्रविडला आरामाची गरज आहे. तसेच न्यूझिलंड दौऱ्यानंतर बांग्लादेशचा दौरा लगेच होणार आहे” असं भन्नाट उत्तर आश्विनने शास्त्रींना दिलं आहे.
“माझा विश्रांती घेण्याला विरोध आहे. तुम्ही तुमच्या टीमला समजून घ्या. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला देखील समजून तितकचं गरजेचं आहे. विशेष म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवायला शिका, तुम्हाला ब्रेक घेण्याची गरज का पडते. ज्यावेळी टीम इंडियामध्ये आयपीएल सुरु होतं. त्यावेळी तुम्ही सुट्टी घ्या. पण इतरवेळीतर टीम इंडीया कायमस्वरुपी प्रशिक्षक असायला हवा अशी टीका शास्त्रींनी द्रविडवरती केली होती.