R.Ashwin | टीम इंडियाला झटका, अश्विन तिसऱ्या टेस्टमधून बाहेर, तडकाफडकी का परतला घरी ?
रविचंद्रन अश्विनला मॅच मध्यात सोडूनच घरी परतावे लागले आहे. म्हणजेच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा अश्विनविनाच हा उर्वरित सामना खेळावा लागेल. भारतीय संघासाठी हा एक मोठा झटका मानला जात आहे.
R. Ashwin | भारत आणि इंग्लंडदरम्यान राजकोटमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. मात्र या मॅच दरम्यानच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जॅक क्राउलीला बाद करत आर अश्विनने 500 विकेट्सचा पल्ला गाठला. तब्बल 500 बळी टिपत इतिहास रचणारा रविचंद्रन अश्विन या मॅचमधून बाहेर पडला आहे. बीसीसाआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, कुटुंबातील मेडिकल इमर्जन्सीमळे अश्विन हा सामना सोडून तडकाफडकी घरी परतला आहे. त्यामुळेच शनिवारी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा अश्विन खेलमार नाही. त्याऐवजी पर्यायी खेळाडू फिल्डींग करेल. BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केलेल्या ट्विटनुसार, अश्विनच्या आईची तब्येत खराब आहे. आणि त्यामुळेच तो ही मॅच अर्धवट सोडून चेन्नईला परतला आहे.
Wishing speedy recovery of mother of @ashwinravi99 . He has to rush and leave Rajkot test to Chennai to be with his mother . @BCCI
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) February 16, 2024
बीसीसीआयने जारी केलं निवेदन
यासंदर्भात बीसीसीआयने एक निवेदन जारी केलं आहे. ‘ कुटुंबातील मेडिकल इमर्जन्सीमुळे रविचंद्रन अश्विनला कसोटी संघातून तत्काळ बाहेर पडला आहे. या कठीण काळात बीसीसीआय ठामपणे अश्विनच्या पाठीशी उभी आहे. बोर्ड अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल.’ ‘ आम्ही अश्विन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि कठीण काळात त्यांच्यासोबत आहोत, ‘ असे बीसीसीआयने म्हटले आहे. ‘ बोर्ड आणि टीम इंडियाकडून अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. सर्व चाहते आणि माध्यमांनी त्यांच्या आखसगी जीवनाचा आणि गोपनीयतेचा आदर राखावा अशी टीम इंडियाची अपेक्षा आहे.’ असेही या निवेदनात नमूद करण्यात आले.
R Ashwin withdraws from the 3rd India-England Test due to family emergency.
In these challenging times, the Board of Control for Cricket in India (BCCI) and the team fully supports Ashwin.https://t.co/U2E19OfkGR
— BCCI (@BCCI) February 16, 2024
अश्विनने पार केला 500 विकेट्सचा पल्ला
भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे तिसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात टीम इंडियाने 445 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने 2 गडी गमवून 207 धावा केल्या आहेत. अजूनही भारताकडे 238 धावांची आघाडी आहे. शुक्रवारी आर. अश्विनने एक गडी बाद करत 500 विकेट्सचा पल्ला गाठला. आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये जलद 500 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. 98 कसोटी सामन्यात आर अश्विनने ही किमया साधली आहे. मुरलीधरनने 500 विकेट्स 87 सामन्यात घेतले होते.
तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला यावेळी रविचंद्रन अश्विनची खूप गरज आहे. अश्विनने पाचशे विकेट्स पूर्ण केल्या, पण आता पुढले तीन दिवस तो टीम इंडियासोबत नसेल. भारतीय संघ आता कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 10 खेळाडू आणि एक बदली खेळाडू घेऊन मैदानात उतरणार आहे.