मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाचे (Australia vs India 2nd Test) वर्चस्व आहे. तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाने नाममात्र 2 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत सामन्यावर टीम इंडियाचे वर्चस्व राहिले आहे. टीम इंडिया बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाडीवर यशस्वी ठरली. रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) या दुसऱ्या सामन्यात आतापर्यंत अष्टपैलू कामगिरी केली आहे. (ravindra jadeja all round performence against australia 2nd test at mcg)
तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. या 6 विकेट्सपैकी जाडेजाने 2 विकेट्स घेतल्या. मॅथ्यू वेड आणि कर्णधार टीम पेन असे 2 महत्वाचे विकेट्स घेतले. मॅथ्यू वेड टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होता. या मॅथ्यू वेडला जाडेजाने 40 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. तसेच कर्णधार टीम पेनला विकेटकीपर पंतच्या हाती आऊट केलं.
त्याआधी टीम इंडियाचा पहिला डावात 326 धावा केल्या. यामध्ये जाडेजाची महत्वाची भूमिका राहिली. रहाणेने चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी हनुमा विहारी आणि पंतसोबत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र या दोन्ही अर्धशतकी भागीदारीनंतर विहारी आणि पंत बाद झाले. त्यामुळे टीम इंडियाला मोठ्या आणि स्थिर भागीदारीची आवश्यकता होती.
जाडेजाने कर्णधार रहाणेला चांगली साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 121 धावांची निर्णायक भागीदारी केली. या भागीदरम्यान जाडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केलं. रहाणे-जाडेजा जोडीच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाला 131 धावांची आघाडी मिळाली. जाडेजाने पहिल्या डावात 57 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 चौकार लगावले.
THE SWORD‼️⚔️ Jadeja brings up his 50 ?
?Watch Day 3 #AUSvIND Test on Fox Cricket or Kayo: https://t.co/V275n130EX
?Live blog: https://t.co/IvPwkpYEjb
?Match Centre: https://t.co/hSscBuONMn pic.twitter.com/ehJuy6r82E
— Fox Cricket (@FoxCricket) December 28, 2020
त्याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांवर गुंडाळला. जाडेजाने या पहिल्या डावात मॅथ्यू वेडची एकमेव पण महत्वाची विकेट घेतली. जाडेजा 2o16 पासून कसोटी क्रिकेटमधील यशस्वी ऑलराऊंडर खेळाडू आहे. जाडेजाने 46.29 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच जाडेजाची गोलंदाजी करताना 24.97 इतकी सरासरी राहिली आहे.
संबंधित बातम्या :
PHOTO | जबरदस्त जाडेजा ! कसोटी क्रिकेटमध्ये बॅटिंगच्या बाबतीत दिग्गज फलंदाजांना देतोय टक्कर
(ravindra jadeja all round performence against australia 2nd test at mcg)