आधी धोनीकडून टिप्स, नंतर धोनीचाच मोठा विक्रम मोडीत, रवींद्र जडेजाची शानदार कामगिरी
टीम इंडियाने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कॅनबेरा : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Team India Tour Australia 2020-21) पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीदेखील घेतली आहे. टीम इंडियाने सलामीवीर के. एल. राहुल (51 धावा) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला निर्धारित 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. (Ravindra Jadeja breaks MS Dhoni record registers highest score by an Indian at no 7 in T-20)
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरॉन फिंचने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर डॉर्सी शॉटने 34 धावांची खेळी केली. मोईसेस हेनरिकेसनेही 30 धावा केल्या. परंतु यापैकी कोणालाही मोठी खेळी करत संघाला विजय मिळवून देता आला नाही. टीम इंडियाकडून फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि टी-20 मध्ये पदार्पण करणाऱ्या थंगारासू नटराजनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने 1 विकेट मिळवली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा त्याचा फॉर्म सिद्ध केला. काही दिवसांपूर्वी जडेजा म्हणाला होता की, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) त्याला अंतिम षटकांमध्ये फटकेबाजी कशी करायची याबाबतच्या टिप्स दिल्या होत्या. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात जडेजाने डेथ ओव्हर्समध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 23 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 44 धावा चोपल्या. भारताला पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून देण्यात जडेजाचं महत्त्वपूर्ण योगदान होतं.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनीकडून डेथ ओव्हर्समध्ये फटकेबाजी कशी करायची, याबाबतच्या टिप्स घेणाऱ्या रवींद्र जडेजाने धोनीचाच एक विक्रम मोडीत काढला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता. 2012 मध्ये धोनीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 18 चेंडूत 38 धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जडेजादेखील सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी त्याने 23 चेंडूत 44 धावा फटकावल्या आणि धोनीचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.
जडेजा टी-20 सीरिजमधून बाहेर
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 सीरिजमधून बाहेर झाला आहे. पहिल्या टी-20 सामन्यात बॅटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे जडेजाला या सामन्याला मुकावे लागले होते. आता तो पुढील दोन्ही टी-20 खेळू शकणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. शुक्रवारी झालेल्या टी-20 सामन्यादरम्यान मिचेल स्टार्क (Mitchell Starc) शेवटचे षटक टाकत होता. या षटकातील मिचेलने टाकलेला दुसरा चेंडू जडेजाच्या हेल्मेटवर येऊन आदळला. त्यानंतरही जडेजाने उर्वरीत चार चेंडू खेळून काढले खरे, परंतु त्याला मोठी दुखापत झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
UPDATE: Ravindra Jadeja was hit on the helmet in the final over of the first innings of the first T20I.
Yuzvendra Chahal will take the field in the 2nd innings as a concussion substitute. Jadeja is currently being assessed by the BCCI Medical Team. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/tdzZrHpA1H
— BCCI (@BCCI) December 4, 2020
दरम्यान, जडेजाच्या जागी कन्कशन नियमांनुसार (Concussion Substitute) युजवेंद्र चहलला सब्स्टिट्यूट (बदली खेळाडू) म्हणून संधी देण्यात आली. त्यामुळे या सामन्यात जडेजाऐवजी चहलने गोलंदाजी केली. विशेष म्हणजे सब्स्टिट्यूट म्हणून गोलंदाजी करणाऱ्या चहलने चार षटकात 25 धावा देत 3 बळी घेतले आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
संबंधित बातम्या
(Ravindra Jadeja breaks MS Dhoni record registers highest score by an Indian at no 7 in T-20)