Ind vs Aus : स्मिथकडून अभ्यास आश्विनचा, पेपर आला जडेजाचा अन् झाला क्लीन बोल्ड
जडेजाने मॅजिक बॉल टाकत स्मिथला बोल्ड आऊट केलं. बोल्ड होताच तो जाग्यावरच उभा राहिला त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या संघाला ऑलआऊट केलं आहे. कांगारूंचा पहिला डाव अवघ्या 177 धावांवर गुंडाळला. यामध्ये कमबॅक करणाऱ्या सर रविंद्र जडेजाने आपल्या फिरकीच्या तालावर ऑस्ट्रेलियन बॅट्समनला नाचवलं. एकट्या जडेजाने 5 विकेट्स घेत अर्धा संघ तंबूत पाठवला. तर दुसरीकडे त्याला आर. आश्विननेही मोलाची साथ दिली. आश्विनने तीन विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. भारतासाठी कायम डोकेदुखी ठरणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सर जडेजाने बोल्ड आऊट केलं.
सामन्याच्या 42 व्या षटकामध्ये जडेजाने मॅजिक बॉल टाकला. स्मिथला जागेवरून हलूही दिलं नाही. बोल्ड झाल्यावर स्मिथलाही विश्वास बसला नाही की तो बोल्ड झाला आहे. बोल्ड होताच तो जाग्यावरच उभा राहिला त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. बिग बॅश लीगमध्ये स्मिथने शतके मारत भारताचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र तब्बल पाच महिन्यांनी पदार्पण करणाऱ्या जडेजाने हा अडसरा दुर केला. स्मिथ एकदा सेट झाला की तो काही लवकर बाद होत नाही. याआधी अनेक सामन्यांमध्ये त्याने शतके ठोकली आहेत.
Jadeja in 2nd session: 5-1-15-3.pic.twitter.com/UW2hKMJCme
— Rohit.Bishnoi (@The_kafir_boy_2) February 9, 2023
रविंद्र जडेजाने 22 ओव्हरमध्ये 47 धावा देत 5 बळी घेतले. मार्नस लॅबुशेन (49), स्टीव्ह स्मिथ (37), मॅट रेनशॉ (0), पीटर हँड्सकॉम्ब (31) आणि टॉड मर्फी (0) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जडेजानंतर सर्वाधिक विकेट्स आर आश्विनने घेतल्या. अश्विनने 3 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव आणि के एस भरत यांनी पदार्पण केलं. ऋषभ पंत अपघातामुळे या सीरीजला मुकला त्याच्या जागी के एस भरतला संधी मिळाली. शुबमन गिल आणि सुर्यकुमार यादव यांच्यामधील एका कोणाला तरी संधी मिळणार होती. संघ व्यवस्थापनाने सुर्याला खेळवण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र ज डेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.