10 कोटींची चिअर लीडर म्हणून हिणवलं, त्याच खेळाडूची फटकेबाजी पाहून ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूची पलटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 38 धावांनी विजय मिळवला आहे.
चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) आज 10 वा सामन्यात खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 38 धावांनी विजय मिळवला आहे. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावाच करता आल्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. तर बंगळुरुकडून कायले जेमिन्सनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. बंगळुरुचा हा या मोसमातील सलग तिसरा विजय ठरला. बंगळुरुचे मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) हे विजयाचे शिल्पकार ठरले. (RCB vs KKR : Virender Sehwag Appreciates Glenn Maxwell for IPL 2021 performance)
आयपीएल 2021 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत त्याने सलग दोन वेळा अर्धशतकी खेळी केल्या आहेत. आयपीएलमध्ये यंदा त्याने खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये 176 ( पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 39, दुसऱ्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 59 आणि तिसऱ्या सामन्यात कोलकात्याविरुद्ध 78) धावा फटकावल्या आहेत. यंदाच्या स्पर्धेतील मॅक्सवेलचा परफॉर्मन्स पाऊन क्रीडा समीक्षक त्याचं कौतुक करु लागले आहेत. तसेच त्याच्यावर टीका करणाऱ्यांची तोंडं त्याने बंद केली आहेत. माजी भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागही त्यापैकीच एक आहे.
विरेंद्र सेहवागने यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलवर जोरदार टीका केली होती. परंतु मॅक्सवेलने आता सहवागचं तोंड बंद केलं आहे, सोबतच त्याला आपलं कौतुक करण्यास भाग पाडलं आहे. ग्लेन मॅक्सवेलने आजच्या सामन्यात कोलकात्याविरुद्ध 9 चौकार आणि 3 षटकारांसह 49 चेंडूत 78 धावा फटकावल्या. त्याची ही खेळी पाहून सेहवाग खूप खूष झाला आहे. सेहवागने एक ट्विट करत मॅक्सवेलचं कौतुक केलं आहे. सेहवागने ‘लुडो’ या चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘अलबेला’ चित्रपटातील गाण्याद्वारे मॅक्सवेलच्या आयपीएलमधील याअगोदरच्या संघांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये सेहवागने लिहिलं आहे की, “अखेर मॅक्सवेलला आयपीएलमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करताना पाहून आनंद झाला”.
सेहवाग मॅक्सवेलला 10 कोटींची चीअरलीडर म्हणाला होता
आयपीएल 2020 नंतर सेहवागने मॅक्सवेलला 10 कोटी रुपयांची चीअरलीडर म्हटलं होतं. आयपीएल 2020 मधील मॅक्सवेलची कामगिरी पाहून विरेंद्र सेहवागने मॅक्सवेलवर टीका केली होती. आयपीएल 2020 मध्ये मॅक्सवेलने 13 सामन्यांमध्ये केवळ 108 धावा जमवल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेत तो एकही षटकार फटकावू शकला नव्हता. मॅक्सवेलचा हा परफॉर्मन्स पाहून सेहवाग म्हणाला होता की, 10 कोटींची चीअरलीडर किंग्ज इलेव्हन पंजाबला भारी पडली. मॅक्सवेल दरवर्षी असंच करतो, तो खूप कामचोर झाला आहे. तेच त्याचं रुटीन आहे. यंदाच्या (2020) सीझनमध्ये तर त्याने स्वतःचाच रेकॉर्ड मोडित काढला आहे. यालाच म्हणतात हायली पेड व्हेकेशन (Highly Paid vacation).
मॅक्सवेलची आयपीेलमधील फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील कामगिरी
सामने | नाबाद | धावा | हायस्कोर | सरासरी | चेंडू | SR | 100 | 50 | 4s | 6s | CT | ST | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
IPL कारकीर्द | 82 | 11 | 1505 | 95 | 22.13 | 973 | 154.67 | 0 | 6 | 118 | 91 | 30 | 0 |
2020 | 13 | 4 | 108 | 32 | 15.42 | 106 | 101.88 | 0 | 0 | 9 | 0 | 4 | 0 |
2018 | 12 | 0 | 169 | 47 | 14.08 | 120 | 140.83 | 0 | 0 | 14 | 9 | 4 | 0 |
2017 | 14 | 3 | 310 | 47 | 31.00 | 179 | 173.18 | 0 | 0 | 19 | 26 | 7 | 0 |
2016 | 11 | 2 | 179 | 68 | 19.88 | 124 | 144.35 | 0 | 2 | 14 | 8 | 3 | 0 |
2015 | 11 | 0 | 145 | 43 | 13.18 | 112 | 129.46 | 0 | 0 | 13 | 8 | 2 | 0 |
2014 | 16 | 0 | 552 | 95 | 34.50 | 294 | 187.75 | 0 | 4 | 48 | 36 | 9 | 0 |
2013 | 3 | 1 | 36 | 23 | 18.00 | 27 | 133.33 | 0 | 0 | 1 | 4 | 1 | 0 |
2012 | 2 | 1 | 6 | 3* | 6.00 | 11 | 54.54 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 |
संबंधित बातम्या
पोलार्डचा जलवा सुरु, IPL 2021 मोसमातील सगळ्यात लांब षटकार, पाहा पोलार्डच्या बॅटमधल्या ‘जादू’चा Video
(RCB vs KKR : Virender Sehwag Appreciates Glenn Maxwell for IPL 2021 performance)