ICC ने टी-20 वर्ल्ड कप संघाची केली घोषणा, ना मंधाना ना हरमन ‘या’ खेळाडूने मिळवली जागा!

ICC ने महिला T20 विश्वचषक 2023 साठी टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे.

ICC ने टी-20 वर्ल्ड कप संघाची केली घोषणा, ना मंधाना ना हरमन 'या' खेळाडूने मिळवली जागा!
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 7:36 PM

मुंबई : आताच महिला टी-20 वर्ल्ड कप पार पडला, यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने सलग तिसऱ्यांदा तर सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने महिला T20 विश्वचषक 2023 साठी टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. आयसीसीने 11 खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या आधारे टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान दिलं आहे. भारताच्या स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौैर यांना आपली जागा मिळवता आली नाही.  फक्त एकाच खेळाडूचा या टीममध्ये समावेश आहे.

ICC ने जाहीर केलेल्या या संघामध्ये एकमेव भारतीय खेळाडू रिचा घोषचा समावेश आहे. रिचा घोषने 5 सामन्यांमध्ये एकूण 136 धावा केल्या आहेत. या धावांमध्ये तिने एकदाही अर्धशतक झळकवलं नाहीपण भारतासाठी महत्त्वाच्या खेळी उपयुक्त बॅटींग केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ती लवकर बाद झाली आणि त्या सामन्यात भारताचा पराभव झाला.

आयसीसीने जो संघ जाहीर केला आहे त्यामध्ये ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगचाही यामध्ये समावेश नाही. जिने ऑस्ट्रेलियाच्या संघाला सहाव्यांदा T20 विश्वचषक चॅम्पियन बनवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सलग तिसरे विजेतेपद पटकावले आहे. आयसीसीने इंग्लंडचा कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. या संघात ऑस्ट्रेलियाच्या 4 खेळाडूंना स्थान मिळाले आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या तीन, इंग्लंडचे दोन, तर भारत आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान देण्यात आलं आहे.

ICC ने जाहीर केलेली टीम ऑफ द टूर्नामेंट- नैट स्कव्हरब्रंट (कर्णधार) ताजमिन ब्रिट्स, एलिसा हीली (विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ट, , एश गार्डर, ऋचा घोषणा, सोफी एकलेस्टोन, करिश्मा रैमहार्क, डार्की ब्राउन, शबनिम इस्माईल आणि मेगन सुट

दरम्यान, या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने पराभव केला होता. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यात अपयश आलं.  लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांना मोठी खेळी करता आली नव्हती. दुसरीकडे  हरमनप्रीत कौरची अर्धशतकी खेळी अपयशी ठरली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.