Virat Kohli : विराट कोहली शतकाच्या बाबतीत तेंडुलकरचा विक्रम मोडू शकेल का ?
आशिया चषकात विराट कोहलीने शतक मारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.
विराट कोहलीकडून (Virat Kohli) मागच्या तीन वर्षात अधिक धावा झाल्या नाहीत. तसेच त्याने तीन वर्षानंतर आशिया चषकात (Asia Cup 2022) आपलं पहिलं शतक झळकावलं. त्यामुळे तो आता सचिन तेंडूलकरांच्या (Sachin Tendulkar) पाठोपाठ आहे. आशिया चषकातल्या कामगिरीमुळे विराटच्या रेकॉर्डची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
आशिया चषकात चांगल्या धावा केल्यामुळे विराट कोहली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटच्या कामगिरीक़डे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
आशिया चषकात विराट कोहलीने शतक मारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग याने एक मोठं वक्तव्य केलं आहे. “विराट कोहली एकदा धावा करायला लागला तर तो कधी शतकांचा रेकॉर्ड करेल हे सांगू शकत नाही.
विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये असताना चांगल्या धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या नावावर सुद्धा अधिक रेकॉर्ड झाले आहेत. आता केव्हा तो रेकॉर्ड पुर्ण करतोय. याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.