Dinesh Karthik : ऋषभ पंत, दिनेश कार्तिक या दोघांपैकी कोणाला संधी, रिकी पाँटिंग म्हणतोय…
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग म्हणतोय, टीम इंडियाची मधली फळी एकदम मजबूत आहे.
टीम इंडियाची (Team India) आज ऑस्ट्रेलियासोबत (Australia) दुसरी मॅच आहे. मागच्या सामन्यात खराब कामगिरी केल्याने दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. आशिया चषकात संधी मिळूनही ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिनेश कार्तिकला संधी दिली होती.
मागची काही वर्षे महेंद्र सिंग धोनी विकेट किपिंगचं काम संभाळत होता. त्यामुळे दिनेश कार्तिकला अधिक संधी मिळाली नाही. ऋषभ पंत धोनी निवृत्त झाल्यानंतर संघात आला.
आजच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये बदल करण्यात येणार आहे. जसप्रित बुमराहला संधी मिळाल्यानंतर भुवनेश्वर कुमारला डिच्चू मिळू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग म्हणतोय, टीम इंडियाची मधली फळी एकदम मजबूत आहे. तसेच ऋषभ पंत, दिनेश कार्तिक हे दोन्ही फलंदाज खतरनाक आहेत. टीम इंडियामध्ये सध्या चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी ऑस्ट्रेलियासाठी खतरनाक ठरु शकते.
आजच्या मॅचसाठी संभाव्य टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल