Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant IPL 2022 : ऋषभ पंतचे सलग तीन षटकार, शेवटच्या बॉलवर गोलंदाजाने फसवले

विशेष म्हणजे ऋषभ पंतने एका षटकात तीन षटकार लगावले, तेही सलग चेंडूवरती त्यामुळे तो मोठी खेळी साकारेल असं वाटतं होतं. पण श्रेयस गोपालच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला.

Rishabh Pant IPL 2022 : ऋषभ पंतचे सलग तीन षटकार, शेवटच्या बॉलवर गोलंदाजाने फसवले
ऋषभ पंतचे सलग तीन षटकारImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 3:10 PM

मुंबई – आयपीएलचे (IPL 2022) सामने जसे होतील तशी सामन्यातील रंगत अधिक वाढत आहे. काल झालेल्या सामन्यात अधिक चांगले फटके पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) आणि सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) सामना होता. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉन मैदानात होता. कालच्या सामन्यात दिल्लीचे कॅप्टन ऋषभ पंत याच्याकडून चांगली खेळी होण्याची शक्यता दिसत होती. परंतु काही काळ मैदानावर तो स्थिरावल्यानंतर बाद झाला. त्याने 18 बॉलमध्ये 26 धावा केल्या. त्यामध्ये तीन षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे.

एका षटकात तीन षटकार लगावले

विशेष म्हणजे ऋषभ पंतने एका षटकात तीन षटकार लगावले, तेही सलग चेंडूवरती त्यामुळे तो मोठी खेळी साकारेल असं वाटतं होतं. पण श्रेयस गोपालच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. श्रेयस गोपाल सामन्यातील नववं षटक टाकत होता. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतने षटकार लगावले. पण शेवटच्या चेंडूवर श्रेयस गोपालने चेंडू मागच्या बाजूने वळवला, त्यावेळी चेंडू ऋषभ पंतच्या बॅटला लागून विकेट किपरच्या हातात झेल गेला. त्यावेळी ऋषभ पंतचे चाहते नाराज झाले.

श्रेयस गोपालची ओव्हर

पहिला बॉल – 0 धावा दुसरा बॉल- 6 धावा तिसरा बॉल – 6 धावा चौथा बॉल – 6 धावा पाचवा बॉल – 4 धावा सहावा बॉल – विकेट

डेव्हिड वॉर्नरची तुफान खेळी

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 3 गडी गमावून 207 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 92 धावा केल्या. तसेच रोमन पॉवेलने 35 चेंडूंत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 67 धावांची खेळी केली. वॉर्नर आणि रोमन पॉवेल यांनी चौथ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. दोघांनी तुफान फलंदाजी केल्याने दिल्लीच्या 207 धावा झाल्या.

पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.