Australia vs India | बॉक्सिंग डे कसोटीसाठी रिषभ पंत सज्ज

ऑस्ट्रेलियाविरोधातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी रिषभ पंतला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Australia vs India | बॉक्सिंग डे कसोटीसाठी रिषभ पंत सज्ज
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 5:05 PM

मेलबर्न : पहिल्या सामन्यातील लाजीरवाणा पराभव विसरुन टीम इंडिया (Australia vs India )दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली (Boxing Day Test) आहे. टीम इंडिया दुसऱ्या सरावासाठी जोमाने तयारी करत आहे. टीम इंडियात दुसऱ्या सामन्यासाठी मोठे बदल करण्यात येणार आहेत. टीम इंडियामध्ये एकूण 4 बदल केले जाणार असल्याचं म्हटलं जातंय. दुसऱ्या सामन्यात विकेटकीपर बॅट्समन म्हणून ऋषभ पंतला (Rishabhh Pant) संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. खेळण्याची संधी मिळणार असल्याने पंतनेही कंबर कसली आहे. Rishabh Pant practices hard for the Boxing Day Test against Australia

पहिल्या सामन्यात विकेटकीपर रिद्धीमान साहाला फार विशेष कामगिरी करता आली नाही. साहाला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. तर दुसऱ्या डावाच फक्त 4 धावाच करता आल्या. तसेच साहाने पहिल्या डावात मार्नस लाबुशानेचा अवघड असलेला कॅचही सोडला. यामुळे दुसऱ्या सामन्यात साहाऐवजी पंतला संधी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली. पंतने ऑस्ट्रेलिया ए विरोधातील दुसऱ्या सराव सामन्यात शतक ठोकलं होतं. त्यामुळे पंतला दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

एमएसके प्रसादकडून कौतुक

पंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये शतक लगावणारा एकमेव विकेटकीपर फलंदाज आहे. त्यामुळे परदेशात पंतला खेळवायला हवं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटी मालिकेत पंतला संधी न देऊन चूक केली. मात्र ही चूक दुसऱ्या सामन्यात करु नये, असं टीम इंडियाचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटलं.

पंतचा जोरदार सराव

पंतने दुसऱ्या सामन्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे.पंतने जीममध्ये काही वेळ वर्कआऊट केलं. या वर्कआऊटचा व्हिडीओ युट्युबवर शेअर करण्यात आला आहे.

पंतची कसोटी कारकिर्द

पंतने टीम इंडियाकडून आतापर्यंत एकूण 13 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या 13 सामन्यातील 22 डावात पंतने 2 शतक आणि 2 अर्धशतकांसह एकूण 814 धावा केल्या आहेत. 159 ही पंतची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.

संबंधित बातम्या :

Rahul Dravid | बीसीसीआय टीम इंडियांच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवणार?

Australia vs India | पृथ्वी शॉ की केएल राहुल? पाहा आकडेवारी कोणाच्या बाजूने?

Rishabh Pant practices hard for the Boxing Day Test against Australia

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.