स्टम्पच्या मागे उभा राहून रिषभ पंत नेमकं काय गात होता; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भारताने ब्रिस्बेनची कसोटी जिंकल्यापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. | Rishabh Pant

स्टम्पच्या मागे उभा राहून रिषभ पंत नेमकं काय गात होता; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 3:30 PM

मुंबई: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला घरच्या मैदानावर धूळ चारल्यापासून टीम इंडियातील (Team India) खेळाडुंवर सध्या चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. प्रत्येक खेळाडूने सिरीजमध्ये काय केले किंवा नाही, याचा तपशील अनेकांना तोंडपाठ आहे. या सगळ्यात आता ब्रिस्बेन कसोटीचा हिरो ठरलेल्या रिषभ पंत (Rishabh Pant) याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Cricketer Rishabh Pant sings Hindi version of Spiderman during Brisbane Test)

ब्रिस्बेन कसोटीतील चौथ्या दिवशी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी स्टम्पच्या पाठीशी उभा असणारा यष्टीरक्षक रिषभ पंत ‘स्पायडरमॅन स्पायडरमॅन’ हे गाणे गुणगुणत होता. त्याचा हा आवाज स्टम्प माईक्सनी स्पष्टपणे टिपला आहे. काल सामना संपेपर्यंत या प्रकाराची कोणालाच माहिती नव्हती. मात्र, भारताने ब्रिस्बेनची कसोटी जिंकल्यापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडत आहे. एवढेच काय अ‍ॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मनेही या सगळ्या चर्चेत उडी घेत रिषभ पंतच्या चाहत्यांना स्पायडरमॅनचे कोणते चित्रपट पाहावेत हे सुचवले आहे.

व्हिलन होता होता रिषभ पंत हिरो ठरला

टीम इंडियाने ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन संघाची 32 वर्ष अपराजित राहण्याची परंपरा मोडीत काढली. रिषभ पंत टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला. सामना रंगतदार स्थितीत असताना रिषभ पंतने (Rishabh Pant ) निर्णायक भूमिका बजावली. पंतने नाबाद 89 धावांची विजयी खेळी केली. आयपीएल स्पर्धेतील कामगिरीमुळे व्हिलन ठरलेला पंत या शानदार खेळीमुळे हिरो ठरला आहे.

संबंधित बातम्या:

‘तुला’ परमयोद्धा म्हणून ओळखलं जाईल, रवी शास्त्रींचं ड्रेसिंग रुममध्ये तीन मिनिटांचं भाषण

ब्रिस्बेनपासून चंदनापुरीपर्यंत रहाणेंचाच गुलाल, कसोटी मालिका जिंकली, ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेल विजयी!

व्हिलन होता होता रिषभ पंत हिरो ठरला, निर्णायक क्षणी गियर बदलला

(Cricketer Rishabh Pant sings Hindi version of Spiderman during Brisbane Test)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.