IPL 2024 : ऋषभ पंत IPL खेळणार की नाही ? फिटनेस सर्टिफिकेट न मिळाल्याने सस्पेन्स कायम

टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतचा गेल्या वर्षी, 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण कार अपघात झाला होता. त्यामध्ये ऋषभ गंभीररित्या जखमीही झाला होता. त्याच्या लिगामेंटला दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करायला लागल्या, बराच काळ तो हॉस्पिटलमध्ये होता. त्यामुळे गेल्या वर्षभराहून अधिक काळ तो क्रिकेटपासून दूर आहे. आता आयपीएल 2024 मध्ये तो पुनरागमन करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती पण त्यावरही अद्याप टांगती तलवार आहे.

IPL 2024 : ऋषभ पंत IPL खेळणार की नाही ? फिटनेस सर्टिफिकेट न मिळाल्याने सस्पेन्स कायम
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 10:51 AM

IPL 2024 : येत्या 22 (मार्च) तारखेपासून इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल)चा पुढला सीझन सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे चाहते या सीझनसाठी खूप उत्सुक आहेत. मात्र या सीझनची उत्सुकता वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे, त्याद्वारे अनेकांना खेळाडू ऋषभ पंतच्या पुनरागमनाचीही प्रतिक्षा आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असलेला पंत गेल्या सीझनमध्ये खेळू शकला नव्हता. कारण गेल्या वर्षी झालेल्या कार अपघातात त्याच्या लिगामेंटला दुखापत झाली होती. मात्र वर्षभरानंतर आता या सीझनमध्ये ऋषभ पंत पुनरागमन करेल अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र ऋषभ पंतच्या चाहत्यांना यंदाही धक्का बसणार असल्याचे चित्र दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंत याला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून अद्याप फिटनेस सर्टिफिकेट मिळालेले नाही.

ऋषभ पंत याला एनसीएकडून 5 मार्च रोजी फिटनेस प्रमाणपत्र मिळेल, असे दिल्ली कॅपिटल्सचे डायरेक्टर सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र रिपोर्ट्सनुसार, पंतला अद्यापही एनसीएने फिटनेस सर्टिफिकेट दिलेले नाही. त्यामुळे आयपीएल 2024 मधील त्याच्या सहभागाबद्दल अद्यापही साशंकता आहे.

2022मध्ये झाला होता भीषण अपघात

टीम इंडियाचा खेळाडू असलेल्या ऋषभ पंतचा गेल्या वर्षी, 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण कार अपघात झाला होता. त्यामध्ये ऋषभ हा गंभीररित्या जखमी झाला, त्याच्या हातापायाल बरंच लागलं तसंच त्याच्या लिगामेंटलाही दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करायला लागल्या, बराच काळ तो हॉस्पिटलमध्ये होता. त्यामुळे गेल्या वर्षभराहून अधिक काळ तो क्रिकेटपासून दूर आहे. आता आयपीएल 2024 मध्ये तो पुनरागमन करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती पण त्यावरही सर्टिफिकेट न मिळाल्याने त्याच्यावर अद्यापही टांगती तलवार आहे.

कोणताही प्रतिसाद नाही

ऋषभ पंत याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करावी लागणार होती, मात्र त्यामध्ये त्याला क्लिअरन्स मिळू शकलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. पंतची ज्या टीमकडून आयपीएल खेळत होता, त्या दिल्ली कॅपिटल्सने त्याचा फिटनेस अहवाल मागितला होता पण त्यांना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पंत याच्या आयपीएल मधील सहभागा अद्यापही डळमळीत दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यांकडे याबद्दल विचारणा करण्यात आली असता, त्यांनी या वृत्ताचे खंडन तर केले नाही पण टीमला याबद्दल कोणतीही माहिती नाही, असे त्यांच्यातर्पे सांगण्यात आले.

दिल्लीला बसू शकतो मोठा झटका

रिपोर्ट्सनुसार, फिटनेस क्लिअरन्स न मिळाल्याने ऋषभ पंत याला त्याची फ्रँचायझी टीम दिल्लीने अद्याप संघात समाविष्ट केलेले नाही. पंत या मोसमातही खेळू शकला नाही तर दिल्लीसाठी मोठा झटका ठरू शकतो. कारण आयपीएलमध्ये मागच्या मोसमातही संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. यावेळी पंतच्या पुनरागमनाबद्दल दिल्ली संघाला बऱ्याच अपेक्षा होत्या. अखेर आयपीएलचा हा सीझन पंत खेळू शकेल की नाही हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. ९ मार्चपर्यंत पंत याला फिटनेस सर्टिफिकेट मिळाले नव्हते अशी लेटेस्ट खबर आहे. 22 मार्चपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे, आणि तोपर्यंत पंच याला फिटनेस सर्टिफिकेट मिळू शकते. त्याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.