Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ruturaj Gaikwad | धोनीचा ‘हा’ सल्ला उपयुक्त ठरला, ऋतुराज गायकवाडकडून कॅप्टन कूलचे आभार

"धोनी म्हणतो, प्रत्येक परिस्थितीला हसत हसत सामोरे जा, मी ते करण्याचा प्रयत्न करतो" असं म्हणत ऋतुराजने आभार मानले

Ruturaj Gaikwad | धोनीचा 'हा' सल्ला उपयुक्त ठरला, ऋतुराज गायकवाडकडून कॅप्टन कूलचे आभार
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 12:56 PM

दुबई : आत्मविश्वास आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याचा सल्ला, या बळावरच शानदार कामगिरी केली, असा सक्सेस मंत्र ‘चेन्नई सुपरकिंग्ज’चा (Chennai Superkings – CSK) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने सांगितला. आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये सलग दुसरी अर्धशतकी खेळी करत चेन्नईला विजय मिळवून देणाऱ्या ऋतुराजवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Rituraj Gaikwad thanks Captain MS Dhoni for suggestion spellbound performance in CSK match against KKR)

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात ‘कोलकाता नाईट रायडर्स’नी ‘चेन्नई सुपरकिंग्ज’समोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. ऋतुराजने 53 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 72 धावा फटकावून संघाला विजय मिळवून दिला. या खेळीसाठी ऋतुराजला ‘मॅन ऑफ दि मॅच’ पुरस्काराने गौरवण्यातही आले.

सामन्यानंतर ऋतुराज म्हणाला, ‘मला बरं वाटतंय. आत्मविश्वासही वाढला आहे. आम्ही सामने जिंकल्यामुळे माझी दोन्ही अर्धशतकं उपयोगी ठरली. माझा स्वतःवर विश्वास होता. मला माहित होतं, की मला डाव सुरु करण्याची संधी मिळाली आणि मला माझा वेळ मिळाला, तर मी चांगली कामगिरी करेन.’

कोविडमुळे बळकट

‘कोविड 19 ने मला बळकट केले आहे. आमचा कर्णधार (धोनी) म्हणतो की नेहमीच प्रत्येक परिस्थितीला हसत हसत सामोरे जा. हे अवघड आहे, परंतु मी ते करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मला सद्यस्थितीत जगण्यास मदत होते.’ असं म्हणत ऋतुराजने धोनीचेही आभार मानले. आयपीएल सुरु होण्यापूर्वी ऋतुराजला कोरोनाची लागण झाली होती.

विकेट जात असतानाही ऋतुराज पाय रोवून मैदानात उभा होता. मात्र ऋतुराज फटका मारण्याच्या नादात क्लीन बोल्ड झाला. शेन वॉटसन-ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली.

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. कोलकाताने चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. (Rituraj Gaikwad thanks Captain MS Dhoni for suggestion spellbound performance in CSK match against KKR)

रवींद्र जडेजाने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सिक्सर खेचत विजय मिळवून दिला. चेन्नईने 4 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. रवींद्र जडेजाने निर्णायक क्षणी 11 चेंडूत 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने नाबाद 31 धावांची विजयी खेळी केली. धोनीला आजही चांगली कामगिरी करता आली नाही. धोनी अवघ्या एका धावेवर माघारी परतला. कोलकाताकडून पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्थीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या :

चेन्नईचा ऋतुराज गायकवाड आयसोलेशनमध्येच, मुंबईविरुद्ध सामन्यात अनुपस्थितीची चिन्हं

(Rituraj Gaikwad thanks Captain MS Dhoni for suggestion spellbound performance in CSK match against KKR)

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.