Road Safety World Series Final | टीम इंडिया लेजेंड्स विरुद्ध श्रीलंका लेजेंड्स आमनेसामने, विजेतेपदासाठी रंगणार सामना
टीम इंडिया लेजेंड्स विरुद्ध श्रीलंका लेजेंड्स (india legends vs sri lanka legends final match) यांच्यात विजेतेपदासाठी काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
रायपूर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेत (Road Safety World Series) आज (21 मार्च) अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हा अंतिम सामना इंडिया लेजेंड्स (Indian Legends) विरुद्ध श्रीलंका लेजेंड्स (Sri Lanka Legends) यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. रायपूरमधील शहिद वीर नारायण सिंह आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये या मॅचचे आयोजन करण्यात आले आहे. (Road Safety World Series 2021 india legends vs sri lanka legends final match)
The series is set to come to a close tonight…get ready for some nail biting excitement at 7pm!!..@sachin_rt @IrfanPathan #SachinTendulkar #irfanpathan #dilshan #RoadSafetyWorldSeries2021 #RoadSafetyWorldSeries #unacademyroadsafetyworldseries #indianlegends pic.twitter.com/xweUFHXOsM
— India Legends (@IndiaLegends1) March 21, 2021
या अंतिम सामन्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या 2011 च्या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्या अंतिम सामन्यातही हे दोन्ही संघ आमनेसामने भिडले होते. आताच्या श्रीलंकेच्या संघात वर्ल्ड कप 2011 मधील एकूण 6 खेळाडू आहेत. तर इंडिया लेजेंड्सकडे 5 खेळाडू आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकरसह, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, यूसुफ पठाण, मुनाफ पटेलचा समावेश आहे.
श्रीलंकेच्या गोलंदाजीचं आव्हान
इंडिया लेजेंड्समोर श्रीलंकेच्या गोलंदाजांचं आव्हान असणार आहे. स्पीनर दिलशान, नुवन कुलसेकरा आणि धमिका प्रसाद या तिकडीने तगडे आव्हान असेल. कुलसेकराने दक्षिण आफ्रिका विरुद्धातील सेमी फायनल सामन्यात सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
सचिन, सेहवाग आणि युवराज
या टीम इंडियाच्या 3 स्टार फलंदाजांनी या स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. युवराजने 2 सामन्यात सलग 4 षटकार फटकावले आहेत. तसेच सचिन आणि सेहवागही चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे या तिकडीकडून लेजेंड्सला चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेतील साखळी आणि बाद फेरीत अफलातून कामगिरी केली आहे. यामुळे या अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. एका बाजूला हा सामना जिंकून टीम इंडियाचा ट्रॉफी उंचावण्याचा मानस असेल. तर ही फायनल जिंकून वर्ल्ड कप 2011 च्या पराभवाची परतफेड करण्याचा मानस श्रीलंका लेजेंड्सचा असेल. त्यामुळे या अंतिम सामन्यात कोण वरचढ ठरणार हे लवकरच समजेल.
लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?
क्रिकेट चाहत्यांना हा सामना कलर्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसेच Voot आणि Jio App वर हा सामना पाहता येणार आहे.
संभावित संघ
इंडिया लेजेंडस : सचिन तेंडुलकर (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कॅफ, एस बद्रीनाथ, युवराज सिंह, यूसुफ पठान, इरफान पठान, मुनाफ पटेल, मनप्रीत सिंह गोनी, प्रज्ञान ओझा, आर विनय कुमार, नोएल डेविड आणि नमन ओझा.
श्रीलंका लेजेंड्स : तिलरकत्ने दिलशान(कर्णधार), चमारा सिल्वा, दुलंजना विजिनसिंघे, मलिंदा वारनपुरा, सनथ जयसूर्या, उपुल थरंगा, अजंता मेंडिस, धमिका प्रसाद, नुवान कुलसेकरा, रंगना हेराथ, थिलन तुषारा, चिंतका जयसिंघे, परवेज महारूफ, रसेल आर्नोल्ड आणि चमारा कपुगेदरा.
संबंधित बातम्या :
Video: सेहगाव सचिन जोडी पुन्हा मैदानात, वीरुनं पुन्हा ठोकलं, सिक्स मारुन फिफ्टी, पाहा तो व्हिडीओ
(Road Safety World Series 2021 india legends vs sri lanka legends final match)