IND vs BAN: टीम इंडियाच्या या खेळाडूला रोहित शर्माने केली शिवीगाळ, चाहते संतापले
रोहित शर्माचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात काल रोमांचक सामना झाला. कालच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला, कारण टीम इंडियाच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली. कालच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अधिक संपातल्याचा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे कालच्या मॅचमध्ये रोहितने एका खेळाडूला जाहीरपणे शिवी दिली. त्यामुळे रोहित शर्माचा चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला आहे.
रोहित शर्माचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंगटन सुंदर याने शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवरती मेहदी हसन मिराज याचा झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. त्यामुळे रोहित शर्मा चांगलाच संतापला होता.
त्याच्या आगोदर टीम फलंदाज केएल राहूल याने सुध्दा मेहदी हसन मिराज याचा कॅच सोडला होता. त्यामुळे रोहित अधिक संपातल्याचं पाहायला मिळालं. रोहितचा तो व्हिडीओ सोशल मीडियावल अधिक व्हायरल झाला असून चाहत्यांनी रोहितला चांगलचं सुनावलं आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.
बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.