मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना सुरु झाला आहे. आजच्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही टीमसाठी (Today Match) अत्यंत महत्त्वाचा आहे. बांगलादेशच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी आज चांगली खेळी केली नाही. परंतु मधल्या फळीमधील खेळाडूंना डाव सावरला, त्यानंतर तुफान फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं.
pic.twitter.com/SoOLqQYLn1#RohitSharma
हे सुद्धा वाचा— Shivam Rajvanshi (@social_timepass) December 7, 2022
बांगलादेशच्या खेळाडूचा कॅच पकडण्यासाठी हात पुढे केलेल्या रोहित शर्माला चांगलीचं जखम झाली आहे. ज्यावेळी त्यांच्या हातातून कॅच सुटला, त्यावेळी तो हात दुसऱ्या हाताने पकडून मैदानातून बाहेर पडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.रोहित शर्माचं बोट फॅक्चर झाल्याची शक्यता असल्यामुळे त्याला तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संपुर्ण हाताचं स्कॅनिंग झाल्यानंतर पुन्हा तो पॅन्हेलियनमध्ये दिसला आहे.