Rohit Sharma : रोहित शर्माने पराभवाचे खापर कोणावर फोडले, दुखापत किती धोकादायक ? जाणून घ्या कॅप्टन काय म्हणाला
रोहित शर्माने पराभवाचे खापर कोणावर फोडले, पाहा काय म्हणाला...
मुंबई : टीम इंडियाचा (IND) काल बांगलादेश (BAN) टीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव केला. टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव झाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे. बांगलादेश आणि टीम इंडियामध्ये दोन्ही सामने रोमांचक झाले आहेत. कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मॅच वाचवण्यासाठी षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली. परंतु तरीही टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव झाला.
रोहित शर्मा, दीपक चाहर आणि कुलदीप सेन हे तीन खेळाडू जखमी झाल्यामुळे पुढच्या मॅचमध्ये खेळणार नाहीत. 10 डिसेंबरला तिसरी एकदिवसीय मॅच होणार आहे. कालच्या मॅचमध्ये रोहित शर्माने कमी चेंडूत अर्धशतक केलं. त्याचबरोबर शेवटच्या अंतिम षटकात टीम इंडियाला 20 धावांची गरज होती. त्यावेळी रोहित शर्माने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु पाच धावांनी टीम इंडियाचा पराभव झाला.
रोहित शर्माने दुसऱ्या फळीतील गोलंदाजांवरती सगळं पराभवाचं खापर फोडलं आहे. बांगलादेश टीमच्या 100 धावांच्या आतमध्ये सहा विकेट होत्या. त्यानंतर गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करता आली नाही. मधल्या काळात बांगलादेशच्या टीमने चांगल्या धावा केल्या.
त्याचबरोबर “माझ्या बोटाला झालेली जखमी इतकी मोठी नाही. मला वाटलं होतं की फॅक्चर असेल, परंतु बोटाची जखम इतकी गंभीर नसल्यामुळे मी मैदानावर उतरल्याचं रोहित शर्माने सांगितलं.