Rohit Sharma : रोहित शर्माने तोडला धोनीचा नियम, पांड्याचा सपोर्ट
ही नियमावली रोहित शर्माने परंपरेनुसार पाळली होती.
टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धची मालिका जिंकल्याने खेळाडूंची सगळीकडे तारिफ सुरु झाली आहे. विशेष म्हणजे महेंद्रसिंग धोनी (Mahendrasingh Dhoni) हा टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार होता. त्यामुळे त्याने टीम इंडियामध्ये अनेक नियम तयार करुन ठेवले होते. धोनी निवृत्त झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या पावलावर पाय ठेवत ते नियम पाळले होते.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
पण काल ऑस्ट्रेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने तो नियम मोडल्याचं पाहायला मिळाल. ज्यावेळी महेंद्रसिंग धोनी टीमचा कर्णधार होता. त्यावेळी त्याने जिंकलेली ट्रॉफी टीममध्ये सगळ्यात असलेल्या खेळाडूच्या हातात देण्याची प्रथा होती.
विराट कोहली सुद्धा कर्णधार झाल्यानंतर त्याने सुद्धा ही परंपरा कायम ठेवली. कारण त्यावेळी टीम इंडियामध्ये महेंद्र सिंग धोनी विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत होता.
ही नियमावली रोहित शर्माने परंपरेनुसार पाळली होती. परंतु काल मॅच जिंकल्यानंतर रोहित शर्माने खूप दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिनेश कार्तिकच्या हातात दिली.
ज्यावेळी दिनेश कार्तिकच्या हातात चषक दिला त्यावेळी तो थोडासा लाजल्यासारखा करीत होता. पण त्याला हार्दीक पांड्या आणि आर. अश्विनने पुढे खेचले आणि ट्रॉफी हातात घेऊन जल्लोष केला.
पुढच्या महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाकडून अशीचं कामगिरी होईल अशी चर्चा सोशल मीडियावर आहे.