IPL 2021 : रोहित शर्माच्या लेकीने बाबासारखाच सिक्स ठोकला, आईकडून ऋषभ काकाशी तुलना!

बाप वैसी बेटी म्हणतात ते उगीच नाही. टीम इंडियाचा आक्रमक सलामीवार रोहित शर्माच्या लेकीने आपल्या वडीलांची हुबेहुब नक्कल करत बाबासारखाच षटकार ठोकला.

IPL 2021 : रोहित शर्माच्या लेकीने बाबासारखाच सिक्स ठोकला, आईकडून ऋषभ काकाशी तुलना!
रोहित शर्माची लेक समायराचा व्हिडीओ व्हायरल...
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 3:01 PM

मुंबई : बाप वैसी बेटी म्हणतात ते उगीच नाही. टीम इंडियाचा आक्रमक सलामीवार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) लेकीने आपल्या वडीलांची हुबेहुब नक्कल करत बाबासारखाच षटकार ठोकला. तर लहानग्या वयातही क्रिकेटबद्दलची तिची समज एका व्हिडीओमधून नजरेस पडली आहे. रोहितची लेक समायराचा (Rohit Sharma Daughter Samaira) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्या व्हिडीओमध्ये ती मुंबई इंडियन्सचे हेल्मेट घालून रोहितसारखाच पुल शॉट लगावते. (Rohit Sharma Daughter Samaira Cheers Mumbai Indians wear A helmet)

समायराचा व्हिडीओ व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाची तयारी जोरात सुरु आहे. विविध संघांचे ट्रेनिंग कॅम्प सुरु आहेत. मुंबई इंडियन्सचा ट्रेनिंग कॅम्प मुंबईत वानखेडेवर सुरु आहे. याचदरम्यान रोहित शर्माची लेक समायराचा एक गोड व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये रोहित सिक्स कसा मारतो हे दाखवताना ती रोहितचा मनपसंद असलेला पुल शॉट मारुन दाखवते.

मुंबई इंडियन्सकडून व्हिडीओ शेअर

मुंबई इंडियन्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये समायराने मुंबई इंडियन्सचं हेल्मेट घातलं असून ती रोहितच्या प्रसिद्ध पुल शॉटची नक्कल करताना दिसत आहे. तसेच तिने त्या हेल्मेटवरील लोगो हा मुंबई इंडियन्सचा असल्याचं तिने अगदी अचूक ओळखलं आहे.

आईकडून लेकीची तुलना ऋषभ काकासारखी

रोहित शर्माची पत्नी रितीकाने ज्यावेळी लेक समायराला विचारलं ती डॅडी सिक्स कसा मारतो, तर तिने रोहितच्या पुल शॉटची नक्कल करुन दाखवली. तसंच तिने मुंबई इंडियन्सचं अचूक हेल्मेटही ओळखलं. तिने ज्यावेळी डोक्यात हेल्मेट घातलं त्यावेळी तू विकेट कीपरसारखी दिसतीय, असं रोहित म्हणतो. तर रितीका म्हणते की, “तू ऋषभ काकासारखी दिसतीय”

मुंबईच्या कॅम्पमध्ये रोहित शर्मा दाखल

9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी विविध संघांचे कॅम्प सुरु झाले आहेत. मुंबई इंडियन्सचं सराव शिबीर मुंबईतच आयोजित करण्यात आलंय. त्याचनुसार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपण मुंबई इंडियन्स संघाच्या शिबीरात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

आयपीएलचं रण सज्ज

IPL 2021 Date And Schedule : इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(Rohit Sharma Daughter Samaira Cheers Mumbai Indians wear A helmet)

हे ही वाचा :

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या, हे स्टार खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत!

IPL 2021 : चेन्नईच्या भविष्याविषयी महत्त्वाची ‘आकाशवाणी’, ‘पहिल्या 5 पैकी 3 सामने जिंकले तरी मोठी गोष्ट!’

मोठी बातमी : भारत पाकिस्तान आमने-सामने येणार, एप्रिलमध्ये तिरंगी टी ट्वेन्टी मालिका

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.