रोहित शर्माचं पहिलं ‘जुगाड’ विराटमुळे तुटलं होतं, अभिनेत्रीनं ट्विट करुन स्वत:च सांगितलं होतं, नक्की काय होतं प्रकरण…?

रोहितच्या पहिल्या प्रेमाविषयी सोशल मीडियात नेहमी कुजबूज सुरु असते, त्याच्याविषयी चर्चा सुरु असते. आज आम्ही तुम्हाला त्याच छोट्याशा प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत जी कहाणी विराट कोहलीमुळे तुटली... (Rohit Sharma First Relationship With Sofiya Hayat Before Ritika Sajdeh)

रोहित शर्माचं पहिलं 'जुगाड' विराटमुळे तुटलं होतं, अभिनेत्रीनं ट्विट करुन स्वत:च सांगितलं होतं, नक्की काय होतं प्रकरण...?
रोहित शर्मा लग्नाअगोदर अभिनेत्री सोफिया हयातला डेट करत होता...
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 9:23 AM

मुंबई :  भारताचा धडाकेबाज बॅट्समन ज्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतकं आहेत, ज्याला बोलिंग टायकाला जगातले भले भले बोलर्स चळचळ कापतात, जो बॅटिंग करताना जगातील कोणत्याही बोलर्सची भीडभाड ठेवत नाही त्या रोहित शर्माने (Rohit Sharma) वयाची 33 वर्ष पूर्ण करुन 34 व्या वर्षात पदार्पण केलंय. काल 30 एप्रिल रोजी त्याने आपला वाढदिवस मुंबईच्या संघ सहकाऱ्यांसोबत साजरा केला. त्याची पत्नी रितिकानेही विशेष उपस्थिती लावली होती. रोहितच्या बॅटिंगबद्दल जशी चर्चा होते, तशी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमी चर्चा होते. रोहितच्या पहिल्या प्रेमाविषयी सोशल मीडियात नेहमी कुजबूज सुरु असते, त्याच्याविषयी चर्चा सुरु असते. आज आम्ही तुम्हाला त्याच छोट्याशा प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत जी कहाणी विराट कोहलीमुळे तुटली… होय तुम्ही बरोबर वाचताय विराट कोहलीमुळे रोहितचं पहिलं प्रेम त्याच्यापासून दूर गेलं…! (Rohit Sharma First Relationship With Sofiya Hayat Before Ritika Sajdeh Breakup Reason Virat kohli)

विराटमुळे रोहितचं पहिलं जुगाड तुटलं होतं…!

रोहित शर्माचा बॉलिवूड अभिनेत्रीवर जीव जडला होता. परंतु विराट कोहलीमुळे रोहितचं ब्रेकअप झालं. अभिनेत्री सोफिया हयात-रोहित शर्मा एकमेकांना डेट करत होते. परंतु नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. विराट कोहलीमुळे हे ब्रेकअप झाल्याचं खुद्द सोफियाने ट्विट करुन सांगितलं होतं.

सोफियाने ट्विटमध्ये काय म्हटलं होतं…?

रोहित शर्मा आणि सोफिया हे खूप दिवस एकमेकांना डेट करत होते. त्या दोघांनाही अनेक वेळा प्रसिद्धीमाध्यमांनी आपल्या कॅमेरात कैद केलं होतं. परंतु त्यांनी आपल्यातल्या नात्याची वाच्यता केली नव्हती. फक्त आम्ही खूप चांगले मित्र आहोत, असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं. पंरतु पुढे काही दिवसांनी सोफियाने रोहितपासून लांब राहणं पसंत केलं. मी विराटला डावललं कारण विराट हा रोहितपेक्षा चांगला खेळाडू आहे, असं ट्विट तिने एके दिवशी केलं आणि रोहितला पहिल्याच प्रेमात धोका मिळाला.

Sofiya Hayat Tweet

रोहितशी ब्रेकअप करताना सोफियाचं ट्विट…

सोफियानंतर रोहितच्या आयुष्यात रितिका आली…!

रितिका-रोहित 2015 साली लग्नाच्या बेडीत अडकले. रोहितची पहिली गर्लफ्रेंड सोफिया हयातबरोबरच्या ब्रेकअप नंतर त्याची रितिका बरोबर ओळख झाली. पुढे खूप चांगली मैत्री होऊन त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही 2015 साली लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. समायरा ही रोहित-रितिकाची क्युट मुलगी आहे. अनेक मॅचेसला रितिका समायराला घेऊन मैदानावर उपस्थिती लावत असते.

रोहित मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत. आयपीएलचे विजेतेपद सर्वाधिक वेळा मुंबईने जिंकले आहे. मुंबईनंतर सीएसकेने एमएस धोनीच्या नेतृत्वात 3 वेळा आयपीएल करंडक जिंकला आहे.

(Rohit Sharma First Relationship With Sofiya Hayat Before Ritika Sajdeh Breakup Reason Virat kohli)

हे ही वाचा :

‘तूने जिंदगी में आके, जिंदगी बदल दी…’ रोहित शर्माच्या वाढदिवशी पत्नी रितीकाची रोमँटिक पोस्ट!

IPL 2021 : आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!

अश्विनच्या कुटुंबावर ‘नको ती वेळ’, परिवारातल्या तब्बल एवढ्या लोकांना कोरोनाची लागण, पत्नी प्रीतीने सांगितली आपबिती

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.