रोहित शर्माच्या मागे ‘पनौती’, 477 दिवसात एकही शतक नाही, संघातून स्थान मिळणार की नाही?
भारताचा तडाखेबाज क्रिकेटपटू रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईमधील सामन्यात दुसऱ्या डावातही अपयशी ठरलाय.
नवी दिल्ली : भारताचा तडाखेबाज क्रिकेटपटू रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईमधील सामन्यात दुसऱ्या डावातही अपयशी ठरलाय. तो केवळ 12 धावा करुन बाद झाला. बाद होण्याआधी रोहित चांगला लयात वाटत होता. त्याने काही चांगले फटके देखील मारले. मात्र, फिरकीपटू जॅक लिचच्या एका चेंडूवर त्याला माघारी परतावं लागलं. विशेष म्हणजे बाद होण्याआधी रोहितने इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या एका चेंडूवर षटकारही मारला. मात्र, त्यानंतर त्याची विकेट केल्याने भारतीय क्रिकेट टीमला मोठा झटका बसला (Rohit Sharma going from bad form in Test cricket 8 innnigs without a century).
रोहित शर्माने ऑक्टोबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात शेवटचं शतक ठोकलं होतं. रांची येथे झालेल्या या सामन्यात रोहितने शानदार 212 धावांची खेळी केली होती. यानंतर मात्र रोहितचा कसोटी क्रिकेटमधील धावांचा दुष्काळ सुरु झाल्याचं पाहायला मिळालंय. तब्बल 477 दिवसांमध्ये रोहितला एकही कसोटी शकत ठोकता आलेलं नाही. त्यामुळे रोहितच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय. मागील 8 कसोटी डावांमध्ये रोहितने अनुक्रमे 6, 21, 26, 52, 44, 7, 6 आणि 12 अशा धावा केल्यात.
या काळात रोहित दोनदा बांगलादेशविरोधात, दोनदा ऑस्ट्रेलियाविरोधात आणि एकदा इंग्लंडविरोधात खेळलाय. या दरम्यान रोहितने ऑस्ट्रेलियाविरोधात सिडनीमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावलंय. अनेकदा रोहितने चांगल्या पद्धतीने खेळायला सुरुवात केली. मात्र, मोठी धावसंख्या उभारण्याआधीच तो बाद झाला. त्यामुळे त्याच्यावर बेजबाबदारपणे खेळल्याचा आरोपही झाला.
2013 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचा सध्या वाईट फॉर्म सुरु आहे. त्यामुळेच रोहित शर्माचं भारतीय क्रिकेट संघातील स्थान कायम राहणार की नाही याविषयी देखील अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 33 वर्षीय रोहितने एकदिवसीय सामन्यात आपल्या खेळाने चांगलं नाव कमावलं आहे आणि अनेक विक्रमही केलेत. मात्र, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये आपलं नाव करण्यासाठी आता खूप कमी वेळ शिल्लक राहिल्याचंही जाणकार सांगतात. त्यामुळे आगामी काळात रोहितसमोर आपली कामगिरी सुधारत संघात स्थान कायम राखण्याचं आव्हान असणार आहे.
हेही वाचा :
क्रिकेटर्सचा बोलविता धनी कोण? सगळ्यांची भाषा सारखीच कशी? सोशल मीडियात जोरदार चर्चा
कंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का !
रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी उभारणार!, पालकमंत्र्यांशी चर्चा
व्हिडीओ पाहा :
Rohit Sharma going from bad form in Test cricket 8 innnigs without a century