IND vs PAK : रोहित शर्मा पुन्हा जखमी, पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी भारताला मोठा झटका

टी 20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानसोबतच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या कॅम्पमधून आलेल्या बातम्यांनी चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं. त्याचं कारण म्हणजे रोहित शर्मा पुन्हा जखमी झालाय. रोहितला केवळ आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली नाही, तर भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नेटनाही तो जखमी झाला.

IND vs PAK :  रोहित शर्मा पुन्हा जखमी, पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी भारताला मोठा झटका
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 1:09 PM

T20 वर्ल्ड कप 2024 साठी मैदानावर उतरताच रोहित शर्माच्या मागे दुखणं लागलं आहे. दुखापती त्याची पाठच सोत नाहीयेत. आधी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना तो जखमी झाला. त्यातून तो बरा होतोय न होतोय तोच आता पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्याच्या तयारीत असताना रोहित शर्माला पुन्हा दुखापत झाली. 7 जून रोजी नेटमध्ये सराव करताना रोहित शर्मा जखमी झाला. सरावादरम्यान रोहितच्या डाव्या हाताला दुखापत झाली आणि तो वेदनेने कळवळताना दिसला. फलंदाजी करत असताना त्याला ही दुखापत झाली आहे.

T20 2024 वर्ल्डकपमध्ये 9 जून रोजी भारत वि पाकिस्तान सामना होणार असून हा हायव्होल्टेज सामना रंगार आहे. मात्र न्यूयॉर्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन खूपच वाढलं आहे. पण , त्यातला त्यात दिलासादायक बाब म्हणजे रोहित शर्मा हा पुन्हा फलंदाजी करताना दिसला आहे. खरं तर, डाव्या हाताला दुखापत झाल्यानंतर तो वेदनेने कळवळत होता, ते पाहून फिजिओ टीम त्याच्या दिशेने धावत आली. फिजिओने उपचार दिल्यानंतर रोहित पुन्हा नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला.

रोहितला कशी झाली दुखापत ?

पण सरावादरम्यान रोहित शर्माला दुखापत कशी झाली? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा थ्रो डाउन स्पेशालिस्ट नुवानच्या चेंडूवर फलंदाजी करत होता. दरम्यान, खेळपट्टीवरून एक चेंडू उसळला आणि त्याच्या डाव्या हाताच्या ग्लोव्हला लागला, त्यानंतर त्याला भयानक वेदना झाल्या. मात्र, फिजिओने त्याला चेक केल्यानंतर त्याला बरं वाटू लागलं. आता रोहित शर्माने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली पण यावेळी त्याने आपली बाजू बदलली.म्हणजे दुखापतीनंतर तो दुसऱ्या टोकाकडून फलंदाजी करत होता. नेटमध्ये आणखी काही वेळ फलंदाजी केल्यानंतर रोहित शर्मा तिथून निघाला.

बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार, रोहित-विराट अडचणीत

रोहित शर्माला याआधी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला तिथेही मैदान सोडावे लागले होते. मात्र नेटमध्ये फलंदाजी करणे केवळ रोहित शर्मालासाठी नव्हे तर विराट कोहलीसाठीही कठीण होते, त्यालाही समस्या जाणवली. रिपोर्ट्सनुसार, सरावादरम्यान हे दोन स्टार फलंदाज अडचणीत सापडल्यानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे (बीसीसआय) त्यांनी अधिकृतपणे नव्हे तर वैयक्तिकरित्या या प्रकरणी आयसीसीकडे तक्रार केली आहे. बीसीसीआयने सराव क्षेत्रातील खेळपट्टीकडे आयसीसीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.