रोहितचं दीडशतक, अनेक विक्रम खिशात, रितीकाचा जल्लोष

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच वनडे मालिकेतील चौथा सामना, सोमवारी 29 ऑक्टोबरला मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा उपकर्णधार आणि मुंबईकर रोहित शर्माने झंझावती 162 धावांची खेळी केली. रोहितने वनडे कारकिर्दीतील 21वं शतक साजरं करत अनेक विक्रम खिशात टाकले. रोहित शर्माने 137 चेंडूचा सामना करताना 162 धावा ठोकल्या. […]

रोहितचं दीडशतक, अनेक विक्रम खिशात, रितीकाचा जल्लोष
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच वनडे मालिकेतील चौथा सामना, सोमवारी 29 ऑक्टोबरला मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा उपकर्णधार आणि मुंबईकर रोहित शर्माने झंझावती 162 धावांची खेळी केली. रोहितने वनडे कारकिर्दीतील 21वं शतक साजरं करत अनेक विक्रम खिशात टाकले.

रोहित शर्माने 137 चेंडूचा सामना करताना 162 धावा ठोकल्या. यामध्ये 4 गगनचुंबी षटकारांचा तर 20 शानदार चौकारांचा समावेश होता. घरच्या मैदानावर 150 धावांचा टप्पा पार केल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माने त्याच जल्लोषात सेलिब्रेशन केले. यावेळी साऱ्या ब्रेबॉन स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरु होता. यावेळी रोहितची पत्नी रितीका सजदेह-शर्माही मैदानात उपस्थित होती. प्रेक्षक गॅलरीत असलेल्या रितीकाने रोहितच्या शतकानंतर उभं राहून कौतुक केलं.

भारतीय क्रिकेट संघाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रोहितने दीडशतक पुर्ण केल्यानंतर पत्नी रितीकाचं सेलिब्रेशनही दिसत आहे.

रोहितच्या या धमाकेदार खेळीमुळे भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध मोठा विजय मिळवता आला. भारताने हा सामना तब्बल 224 धावांनी जिंकला. या सामन्यात रोहित ज्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होता, ते पाहता तो स्वत:चं चौथे द्विशतक पुर्ण करेल असंच वाटत होतं. मात्र, वेगाने द्विशतकाकडे निघालेला रोहितचा वारु, वेस्ट इंडिजच्या नर्सने रोखला. त्याने रोहितला हेमराजकरवी झेलबाद केलं.

दरम्यान रोहितनं मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे. रोहितने सचिनचा 195 षटकारांचा विक्रम मोडला आहे. रोहितच्या नावावर 198 षटकार जमा झाले आहेत. याशिवाय रोहितनं 186 डावांत 21 शतकं पूर्ण करण्याचा पराक्रम गाजवत, कमी डावात 21 शतकं ठोकण्याच्या यादीत चौथं स्थान मिळवलं आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या तर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला दुसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आफ्रिकेचा माजीधडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स आहे.

View this post on Instagram

And the runs keep on coming for the Hitman ?????? 150 for @rohitsharma45 #TeamIndia #INDvWI

A post shared by Team India (@indiancricketteam) on

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.