India vs Bangladesh Test Series: टीम इंडियाला दुसरा धक्का, टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी
टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी
मुंबई : टीम इंडिया (India) सध्या बांगलादेशमध्ये (Bangladesh) एकदिवसीय मालिका खेळत आहे. दोन मॅच बांगलादेश टीमने जिंकल्या आहेत. त्यामुळे एकदिवसीय मालिकेतील एक मॅच उरली आहे, त्यामध्ये कोणाचा विजय होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियामध्ये खेळाडू जखमी होण्याचं सत्र सुरु आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात जखमी झाल्यानंतर टीम इंडियाचा आणखी एक स्टार गोलंदाज जखमी झाला आहे.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. शमीच्या डाव्या खांद्याला जखम झाल्याने तो उपचार घेत आहे. त्याच्या जाग्यावर उमरान मलिक या गोलंदाजाला संधी देण्यात आली होती. परंतु शमी आता कसोटी टीममधून सुद्धा बाहेर जाण्याची शक्यता आहे.
क्रिकबजने आपल्या रिपोर्टमध्ये अजून शमीचा खांदा नीट झाला नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तो होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार नाही. शमी सध्या बेंगलोरमधील क्रिकेट अॅकाडमीमध्ये उपचार घेत असून
शमीच्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक जखम तुम्हाला नवं काहीतरी शिकवत असते.
कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांगलादेश टीम
बांगलादेश टीम : महमुदुल हसन जॉय, नझमुल हसन शांतो, मोमिनुल हक, यासिर अली चौधरी, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, नुरुल हसन, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, सय्यद खालिद अहमद, इबादत हुसेन, शोरीफुल इस्लाम, झाकीर हसन, रेझाउर रहमान राजा आणि अनामूल हक बिजॉय.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.