AUSvsIND : हनुमा विहारी की रोहित शर्मा? विराटसमोर पेच
Aus vs IND : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पहिल्या कसोटीसाठी संभावीत 12 खेळाडूंची यादी एक दिवस अगोदरच जारी करण्यात आली. मालिकेतील पहिला सामना अॅडिलेडमध्ये खेळवला जाणार आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवीचंद्रन […]
Aus vs IND : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पहिल्या कसोटीसाठी संभावीत 12 खेळाडूंची यादी एक दिवस अगोदरच जारी करण्यात आली. मालिकेतील पहिला सामना अॅडिलेडमध्ये खेळवला जाणार आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांचा या यादीमध्ये समावेश आहे. रवींद्र जाडेजा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि पृथ्वी शॉ यांच्याशिवायच टीम इंडिया मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दुखापतीमुळे पृथ्वी शॉ पहिल्या दोन ते तीन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. सराव करताना त्याला दुखापत झाली होती. पृथ्वी शॉ नसताना भारतासाठी केएल राहुल आणि मुरली विजय सलामीला उतरतील. मधल्या फळीत विराट कोहली कुणावर विश्वास दाखवतो ते पाहणं महत्त्वाचं असेल. कारण, जारी केलेल्या यादीनुसार, हनुमा विहारी किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. या यादीनुसार, इतर कोणत्याही जागेसाठी डोकेदुखी दिसून येत नाही. सलामीसाठी केएल राहुल आणि मुरली विजय, तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली, पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे, तर सहाव्या क्रमांकावर हनुमा विहारी किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. गोलंदाजीची मदार अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्यावर असेल. भुवनेश्वरची पहिल्या सामन्यासाठी निवड करण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक कसोटी मालिका पहिला सामना – 6 डिसेंबर दुसरा सामना – 14 डिसेंबर तिसरा सामना – 26 डिसेंबर चौथा सामना – 3 जानेवारी वन डे मालिका पहिला सामना – 12 जानेवारी दुसरा सामना – 15 जानेवारी तिसरा सामना – 18 जानेवारी