Rohit Sharma: या कारणामुळे रोहितची पत्नी झाली भावूक, म्हणाली “आय लव्ह यू…”
रोहित शर्माची पत्नीची जोरदार चर्चा, सोशल मीडियावर म्हणाली, "आय लव्ह यू..."
मुंबई : कालच्या मॅचमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाल्यानंतर चाहते निराश झाले होते. कारण रोहित शर्माला कालच्या मॅचमध्ये जखम झाल्यानंतर लगेच मैदानातून बाहेर पडला. टीम इंडियासोबत (Team India)असलेल्या डॉक्टरांनी त्याला इतर चाचण्या करुन घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. चाचण्या केल्यानंतर रोहित शर्मा पुन्हा मैदानात उतरला होता.
बांगलादेशच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी चांगली खेळी केल्यानंतर टीम इंडियापुढं मोठं आव्हान होतं. तसेच टीम इंडियाच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी कालच्या सामन्यात खराब खेळी केली. त्यामुळे अंतिम टप्प्यात रोहित शर्माला जखमी असताना सुद्धा मैदानावरती उतरावं लागलं.
रोहित शर्माने कालच्या सामन्यात 28 चेंडूत अर्धशतक पुर्ण केलं. त्यामुळे तो अधिक चर्चेत आला होता. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचं कौतुकं केलं. शेवटच्या षटकापर्यंत सामना चालला, टीम इंडियाने कालचा सामना पाच धावांनी हारला.
रोहित शर्माची कालची खेळी पाहिल्यानंतर पत्नी रितिका तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली आहे. त्यामध्ये तिने “आय लव्ह यू…तू ज्या प्रकारची व्यक्ती आहेस त्याचा मला खूप अभिमान आहे. अशा परिस्थितीत बाहेर जाऊन अप्रतिम खेळी खेळणे खूप छान आहे.”