Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus : याला म्हणतात खरा कॅप्टन! रोहित रन आऊट, पण तरीही होतंय कौतुक, पाहा Video

रोहित शर्माला दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एक चूक महागात पडली. यामळे तो रन आऊट झाला. आपली विकेट गमवावी लागली मात्र तरीपण त्याचं सोशल मीडियावर कौतुक का होतंय ते पाहा!

Ind vs Aus : याला म्हणतात खरा कॅप्टन! रोहित रन आऊट, पण तरीही होतंय कौतुक, पाहा Video
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 3:18 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामना खिशात घातला.115 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 4 गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्यामध्ये फॉर्ममध्ये असलेला कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एक चूक महागात पडली. यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली. रोहित रन आऊट झाला असला तरी त्याचं सोशल मीडियावर कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं? सामन्याच्या 7 ओव्हरमध्ये रोहितने कुहमेनच्या पाचवा बॉल मिड-विकेटच्या दिशेने मारला. रोहितला दोन धावा हव्या होत्या. त्यासाठी त्याने पहिली धाव जोरात घेतली आणि दुसरी धाव घेण्यासाठी माघारी परतला तेव्हा त्याने पाहिलं की पीटर हँड्सकॉम्ब थ्रो करत आहे. मात्र पुजारा आधीच रोहितच्या कॉलमुळे दुसरी धाव घेण्यासाठी निघाला होता. पुजाराला रोहित थांबवणार मात्र तो जवळपास अर्ध्या क्रीजपर्यंत आला होता.

100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला परत माघारी लावलं असतं तर तो बाद झाला असता. रोहितने त्यावेळी पुजाराला काही न बोलता आपली दुसरी धाव पूर्ण केली मात्र पीटर हँड्सकॉम्बचा थ्रो आला होता कीपरने त्याला बाद केलं होतं. रोहित माघारी फिरू शकला असता तर पुजारा बाद झाला असता मात्र रोहितने तसं न करता त्याच्या चुकीचा पुजाराला फटका बसू नये यासाठी आपली विकेट बहाल केली. रोहित शर्माच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. रोहित रन आऊट झाला मात्र त्याने चाहत्यांची मन जिंकलीत.

दरम्यान, या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता. त्यानंतर आता दुसरा कसोटी सामना भारताने 6 गडी राखून जिंकला आहे. मोठ्या विजयामुळे भारताला आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आता फक्त दोन अंकांचा फरक पडला आहे.

मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.