VIDEO : रोहितच्या सिक्सरने सचिनच्या ऐतिहासिक षटकारची आठवण

भारत-पाकिस्तानमध्ये रविवारी ( 16 जून) खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. या मॅचचे सर्व श्रेय मॅन ऑफ द मॅच रोहित शर्माला जाते.

VIDEO : रोहितच्या सिक्सरने सचिनच्या ऐतिहासिक षटकारची आठवण
Follow us
| Updated on: Jun 17, 2019 | 12:16 PM

मुंबई : भारत-पाकिस्तानमध्ये रविवारी ( 16 जून) खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. या मॅचचे सर्व श्रेय मॅन ऑफ द मॅच रोहित शर्माला जाते. रोहित शर्माच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताचा विजय सोयीस्कर झाला. रोहितने 113 चेंडूत 140 धावा केल्या, तसेच 14 चौकार आणि 3 षटकार ठोकत शतकही पूर्ण केले. यामधील एका षटकाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकरच्या षटकाराची आठवण करुन दिली.

रोहितने 26 व्या षटकात हसन अलीच्या पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करत चेंडूला बॅकबॉर्ड पॉइंटच्या दिशेला बाँड्रीच्या बाहेर फेकले. रोहित शर्माचा हा षटकार हुबेहुब सचिन तेंडूलकरच्या 2003 च्या षटकारासारखा होता. 2003 च्या विश्वकप सामन्यात भारत-पाक सामन्या दरम्यान शोएब अख्तरच्या चेंडूवर सचिनने षटकार ठोकला होता. तो षटकारही बॅकवॉर्ड पॉइंटच्या दिशेला बाँड्रीच्या बाहेर गेला होता. सचिनच्या या षटकारची आठवण काल रोहितने करुन दिली.

वर्ष 2003 च्या विश्वकपसामन्यातही भारत आणि पाकिस्तान सेन्चुरिअन मैदानावर आमने-सामने होते. वर्ष 2003 मध्ये पाकिस्तानने भारताला 276 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 26 चेंडू शिल्लक असतानाच गाठलं होते. या सामन्यात सलामी फलंदाज सचिन तेंडूलकरने 75 चेंडूत 98 धावा केल्या होत्या.

मॅन ऑफ द मॅच सचिन तेंडूलकरने आपल्या डावात 12 चौकार आणि एक ऐतिहासिक षटकार लगावला होता. रोहितने काल मारलेला षटकारही हुबेहुब सचिनसारखाच होता. विशेष म्हणजे ओल्ड ट्रॅफॉर्ड मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात सलामी फंलदाज रोहितलाही मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.