Rohit Sharma : चँपियन बनल्यावर रोहित शर्माने पीचवरील माती का चाखली ? कारण वाचून डोळ्यात येतील अश्रू

T20 World Cup 2024 Final IND vs SA : टी20 वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियाने मैदानावर जल्लोष केला. चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चॅखेळपट्टीवर जाऊन तिथली माती आपल्या जिभेवर लावली. रोहितचा हा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

Rohit Sharma : चँपियन बनल्यावर रोहित शर्माने पीचवरील माती का चाखली ? कारण वाचून डोळ्यात येतील अश्रू
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 1:25 PM

कालचा दिवस किंवा रात्र म्हणा, प्रत्येक भारतीयसाठी आणि क्रिकेट चाहत्यासाठी अविस्मरणीय होती. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृ्त्वाखाली भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत इतिहास रचला. अतिशय उत्तम खेळ करत भारताने हा सामना जिंकला आणि टी20 वर्ल्डकपवर नाव कोरलं. या विजयामुळे फक्त भारतीय खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक राहुल द्रविडसह कोट्यालधी क्रिकेट चाहते भावूक झालेले दिसले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू तरळले. या सर्वांच्या सेलिब्रेशनचे आणि अगदी रडण्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आपल्या आवडत्या खेळाडूंचे हे रूप पाहून चाहतेही भावनिक झाले.

आयसीसीने शेअर केला व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

मात्र भारतीय संघ चॅम्पियन बनल्यावर कॅप्टन रोहितने जे केलं त्याचा व्हिडीओही समोर आला असून ते पाहिल्यावर त्याच्याबद्दल तुमच्या मनातील आदर वाढेल. आयसीसीने (ICC) त्याचा व्हि़डीओ शेअर केला आहे. विजयानंतर रोहितने खेळपट्टीवर जाऊन तेथील माती चाखली. हा क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी रोहितने हे केले. रोहितच्या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स आल्या आहेत. विशेष म्हणजे बार्बाडोसच्या मैदानावर त्याने देशाचा तिरंगाही लावला. या सामन्यातील विजयानंतर रोहित आणि विराट दोघेही T20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे हा क्षण या दोन खेळाडूंसाठी अधिक संस्मरणीय ठरला. त्याचीच आठवण ठेवण्यासाठी रोहितने सामन झाला त्या पीचवरील माती चाखली.

रोहित शर्माचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असंख्य भारतीय चाहत्यांना ‘क्रिकेटचा देव ‘ अशी ख्याती असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचीही आठवण झाली. सचिन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा सामना खेळला. तो सामना संपल्यानंतर सचिन खेळपट्टीवर गेला आणि त्याने वाकून नमस्कार केला. रोहितची ही कृती काहीशी तशी, भावूक करणारी होती. अंतिम सामन्यानंतर विराट कोहली तसेच रोहित शर्मानेही T20 मधून निवृत्तीची घोषणा केली .

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

खेळाडूंच्या डोळ्यात आले अश्रू

टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिक पंड्या रडताना दिसला. रोहितने या सामन्यातील शेवटचं षठक पंड्याकडे सोपवलं होतं. त्याने आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली आणि भारताला विजय मिळवून दिला. पांड्यासोबतच सूर्यकुमार यादवनेही टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अत्यंत कठीण परिस्थितीत त्याने शानदार झेल घेतला. हा झेल भारताच्या विजयात अतिशय महत्त्वपूर्णला. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले आणि वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरले.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

रोहितने हार्दिकला केलं किस, मिठीही मारली

टीम इंडियाच्या विजयानंतर मैदानावर तिरंगा अभिमानाने फडकत होता. प्रत्येक खेळाडूच्या हातात देशाचा सुंदर ध्वज होता आणि ते मोकळेपणाने आपल्या भावना, आनंद व्यक्त करत होते. याच वेळी मैदानावर काही खेळाडू टूर्नामेंट ब्रॉडकास्टरशी संवाद साधत होते. त्यावेळी हार्दिक पंड्या हा देखील स्टार स्पोर्ट्सच्या प्रतिनिधीशी बोलत होता. मात्र त्याच इंटरव्ह्यूदरम्यान जे घडलं ते पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. हार्दिकचा इंटरव्ह्यू सुरू असतानाच रोहित शर्मा अचानक मध्ये घुसला आणि त्याने कोणताही संकोच न बाळगता, कोणाचीच पर्वा न करता सरळ हार्दिक पांड्याला घट्ट पकडलं, त्याच्या गालावर किस करून आनंद व्यक्त केला आणि त्याला मिठी मारली. रोहितच्या या कृतीने हार्दिकच्या चेहऱ्यावरही हसू फुललं. हा व्हिडीओ समोर येताच बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला, हिट झाला आणि तो पाहून सगळेच आनंदले.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.