रोहित शर्माच्या मुलीचं बारसं, नाव ठेवलं….
मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा बाप झाला. बाप झाल्याची बातमी कानावर पडताच त्याने विमानतळ गाठलं आणि मुंबई गाठली. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच त्याला ही गुड न्यूज मिळाली. आता तो पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. पण त्याने त्यापूर्वी मुलीचं नाव ठेवलं आहे. पत्नी रितीका आणि लेकीसोबतचा फोटो शेअर करत त्याने एक कविताही लिहिली आहे. […]
मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा बाप झाला. बाप झाल्याची बातमी कानावर पडताच त्याने विमानतळ गाठलं आणि मुंबई गाठली. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच त्याला ही गुड न्यूज मिळाली. आता तो पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. पण त्याने त्यापूर्वी मुलीचं नाव ठेवलं आहे.
पत्नी रितीका आणि लेकीसोबतचा फोटो शेअर करत त्याने एक कविताही लिहिली आहे. लेकीचं नाव समायरा ठेवत असल्याचं रोहितने ट्विटरद्वारे सांगितलंय. भारतात आल्यामुळे रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं.
I spent last nightOn the last flight to you ❤️ Took a whole day up Trying to get way up
Baby Samaira ❤️https://t.co/xR2fjlvwOr This video never fails to give me goosebumps @adamlevine pic.twitter.com/XPNtfwS4qX
— Rohit Sharma (@ImRo45) January 6, 2019
रोहित भारतात आल्याची बातमी बीसीसीआयने पत्रकाद्वारे दिली होती. शिवाय तो 8 जानेवारीला भारतीय संघात पुन्हा सहभागी होणार असल्याचंही सांगितलं होतं. कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. वाचा – ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि टी-20 साठी भारतीय संघ जाहीर
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ तिथूनच न्यूझीलंडला रवाना होईल, जिथे वन डे आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाचा हा मोठा परदेश दौरा आणि घरी चिमुकली लेक अशी अवस्था रोहित शर्माची झाली आहे.
सर्व भावना मागे टाकत रोहित शर्मा आता संघात पुन्हा एकदा दाखल होतोय. लेकीला निरोप दिल्यानंतर तो 8 जानेवारीला भारतीय संघात दाखल होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वन डे मालिका
पहिला सामना – 12 जानेवारी
दुसरा सामना – 15 जानेवारी
तिसरा सामना – 18 जानेवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक
वन डे मालिका
23 जानेवारी – पहिला वन डे सामना
26 जानेवारी – दुसरा वन डे सामना
28 जानेवारी – तिसरा वन डे सामना
31 जेनवारी – चौथा वन डे सामना
3 फेब्रुवारी – पाचवा वन डे सामना
टी-20 मालिका
6 फेब्रुवारी – पहिला टी ट्वेण्टी सामना
8 फेब्रुवारी – दुसरा टी ट्वेण्टी सामना
10 फेब्रुवारी – तिसरा टी ट्वेण्टी सामना