Rohit Sharma: रोहित शर्माने सामना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तरीही चाहते निराश
जखमी असताना सुद्धा रोहित शर्माने अंतिम षटकापर्यंत सामना वाचण्याचा प्रयत्न केला, तरीही चाहते म्हणतात...
मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. सलग दोन सामने बांगलादेश टीमने जिंकल्यामुळे मालिका त्यांनी जिंकली आहे. उरलेला एक सामना कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही एकदिवसीय सामने रोमांचक झाले, पहिली मॅच इंडिया जिंकेल अशी स्थिती असताना सुध्दा बांगलादेश जिंकला. दुसऱ्या मॅचमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) अंतिम षटकापर्यंत मॅचवरती पकड ठेवली होती.
कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एक कॅच पकडत असताना जखमी झाला. ती जखम अधिक असल्याची डॉक्टरांना शंका असल्यामुळे रोहितला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु अनेक चाचण्या झाल्यानंतर तो पुव्हा मैदानात उतरला.
#तुम_पहले_क्यों_नहीं_आए Take a bow #RohitSharma Well fight champion #indvsbang pic.twitter.com/Nea3Imh9Vw
— Vijay Prajapat ?️ (@vijayprajapat_) December 7, 2022
ज्यावेळी टीम इंडियाला धावांची गरज होती. त्यावेळी जखमी रोहित शर्मा मॅच वाचवण्यासाठी मैदानात पुर्णपणे तयारी करुन उतरला. परंतु अंतिम टप्प्यातील खेळाडूंनी रोहित हवी तशी साथ दिली नाही. रोहित मॅच जिंकण्यासाठी अंतिम टप्प्यात षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली. परंतु एका चेंडूवर सहा धावांची गरज असताना, रोहितला तो चेंडू मारता आला नाही.
Every indian saying today ?#तुम_पहले_क्यों_नहीं_आए pic.twitter.com/Pa7rrxwh7q
— Rohit Sharma ? (@ApJehra) December 7, 2022
सोशल मीडियावर रोहित शर्माला पुढच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरले असते, तर टीम इंडिया जिंकली असती अशी चर्चा चाहते करीत आहेत. त्याचबरोबर रोहित स्वत:साठी नाही, देशासाठी खेळला असंही एका चाहत्याने म्हटलं आहे.