विसरभोळा रोहित आणि तीनपैकी 2 सामन्यात बदललेली जर्सी

हॅमिल्टन (न्यूझीलंड): न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माने, या मालिकेतील तीनपैकी दोन सामन्यात वेगवेगळ्या जर्सी घातल्या. रोहित शर्माच्या विसरभोळेपणाचे अनेक किस्से यापूर्वी बातम्यांमधून समोर आले आहेत. कधी रोहित शर्माने हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरला, तर कधी महागडं साहित्य बसमध्येच सोडून गेला होता. सध्या रोहित शर्मा त्याची जर्सी तर विसरला नाही ना असा प्रश्न आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या […]

विसरभोळा रोहित आणि तीनपैकी 2 सामन्यात बदललेली जर्सी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

हॅमिल्टन (न्यूझीलंड): न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माने, या मालिकेतील तीनपैकी दोन सामन्यात वेगवेगळ्या जर्सी घातल्या. रोहित शर्माच्या विसरभोळेपणाचे अनेक किस्से यापूर्वी बातम्यांमधून समोर आले आहेत. कधी रोहित शर्माने हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरला, तर कधी महागडं साहित्य बसमध्येच सोडून गेला होता. सध्या रोहित शर्मा त्याची जर्सी तर विसरला नाही ना असा प्रश्न आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांपैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो दुसऱ्या खेळाडूंची जर्सी घालून मैदानात उतरला.

रोहित शर्माने दुसऱ्या टी 20 सामन्यात विजय शंकरची जर्सी घातली होती. तर तिसऱ्या टी 20 सामन्यात तो हार्दिक पंड्याची जर्सी घालून मैदानात उतरला होता.

एरव्ही रोहित शर्मा 45 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरतो. मात्र अखेरच्या दोन्ही टी 20 सामन्यात त्याची ही जर्सी दिसली नाही. दुसऱ्या टी 20 मध्ये विजय शंकरची 59 नंबरची जर्सी घातली, ती मॅच भारताने जिंकली, तर तिसऱ्या सामन्यात हार्दिक पंड्याची 33 नंबरची जर्सी घालून तो मैदानात उतरला, मात्र भारताचा या सामन्यात निसटता पराभव झाला.

विजय शंकर (43), कर्णधार रोहित शर्मा (38) आणि दिनेश कार्तिकच्या नाबाद 33 धावानंतरही भारताला अखेरच्या निर्णायक टी 20 सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवता आला नाही. भारताचा 4 धावांनी पराभव झाल्याने, ही मालिकाही हातातून निसटली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.