रोहित शर्माचं पाचवं शतक, सचिनच्या विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर

संगकाराने 2015 च्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. दरम्यान, विश्वचषकात सलग सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या विक्रमापासून रोहित शर्मा एक पाऊल दूर आहे. अजूनही हा विक्रम (सलग 4 शतकं) संगकाराच्याच नावावर आहे.

रोहित शर्माचं पाचवं शतक, सचिनच्या विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर
Follow us
| Updated on: Jul 06, 2019 | 10:06 PM

लंडन : श्रीलंकेविरुद्ध हिटमॅन रोहित शर्माने या विश्वचषकातलं पाचवं आणि सलग तिसरं षटक ठोकलंय. त्याने एका विश्वचषकात चार शतकं ठोकण्याचा श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा विक्रमही मोडित काढला. रोहितच्या नावावर आता पाच शतकं झाली आहेत. संगकाराने 2015 च्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. दरम्यान, विश्वचषकात सलग सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या विक्रमापासून रोहित शर्मा एक पाऊल दूर आहे. अजूनही हा विक्रम (सलग 4 शतकं) संगकाराच्याच नावावर आहे.

रोहित शर्माच्या या विश्वचषकातील पाचव्या शतकाने अनेक विक्रम मोडित काढले आहेत. एका विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा विक्रम आतापर्यंत कुमार संगकाराच्या नावावर होता. हा 04 शतकांचा विक्रम मागे टाकत रोहित शर्माने पाचवं शतकही पूर्ण केलं. शिवाय या विश्वचषकात सर्वाधिक धावाही रोहितच्या नावावर जमा झाल्या आहेत. एकाच विश्वचषकात एवढ्या धावा करणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या, तर रोहित शर्माच्या नावावर आता 647 धावा जमा झाल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडित काढण्याचीही रोहितकडे संधी आहे. कारण, अजून सेमीफायनल आणि विजय झाल्यास फायनलमध्येही रोहित शर्मा खेळणार आहे.

विश्वचषकातील 16 डावात सहा शतकं

रोहित शर्माने विश्वचषकात खेळलेल्या 16 डावांमध्ये सहावं शतक ठोकलंय. विश्वचषकात सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकर अजूनही पुढे आहे. सचिनच्या नावावर 44 डावांमध्ये 6 शतकं आहेत. पण रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा यांना मागे टाकलंय. विशेष बाब म्हणजे रोहित शर्माने या दिग्गजांना केवळ 16 डावांमध्येच मागे टाकलं.

विश्वचषकातील शतकं आणि इनिंग

सचिन तेंडुलकर – 6 (44)

रिकी पाँटिंग – 05 (42)

कुमार संगकारा – 05 (35)

रोहित शर्मा – 05 (15)

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू

रोहित शर्माच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत. वन डेमध्ये तीन द्विशतकं ठोकणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे, शिवाय भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झालाय, वन डेत सर्वाधिक शतक असणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो सचिन तेंडुलकर आणि विराटनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. आता विश्वचषकातही रोहितने अनेक विक्रम केले आहेत. एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या. तर 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने 11 सामन्यात 659 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने 647 धावा करत आता तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.