Rohit Sharma : रोहित शर्माच्या जबरा फॅनची पोस्ट व्हायरल, लिहिली मजेशीर गोष्ट
टीम इंडियातील खेळाडूंचे देशभरात फॅन आहेत. प्रत्येकवेळी फॅनकडून खेळाडूला खूष करण्यासाठी अनोखी कृती केली जाते.
रोहित शर्माचे (Rohit Sharma) देशभरात फॅन (Cricket Fan) आहेत. त्यामुळे जिथं मॅच असेल तिथं खेळाडूंचे फोटो काढत असतात. आत्तापर्यंत खेळाडू आणि फॅनचे अनेक किस्से व्हायरल झाले आहेत. तसेच क्रिकेटच्या मैदानात (Cricket Ground) सुद्धा आपल्या चाहत्यांना खूष करण्यासाठी खेळाडू चांगली खेळी करीत असतात.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
टीम इंडियातील खेळाडूंचे देशभरात फॅन आहेत. प्रत्येकवेळी फॅनकडून खेळाडूला खूष करण्यासाठी अनोखी कृती केली जाते.
आशिया चषकात रोहितने खराब कामगिरी केल्यावरती त्यांच्यावरती टीका झाली होती. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने चांगली खेळी केली. त्यामुळे पुन्हा टीम इंडियातील खेळाडूंचं कौतुक होतं आहे.
गुवाहाटीतल्या एका रोहितच्या फॅन प्रत्येक फोटोमागे एक कहाणी असते असं लिहिलं आहे. तसेच रोहितने ज्यावेळी त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी रोहितशी गप्पा सुध्दा मारल्या. ज्यावेळी फॅनच्या लक्षात आलं की, आपण चुकीच्या गप्पा मारीत आहोत. त्यावेळी त्यांनी रोहित शर्माची माफी मागितली.