Rohit Sharma Video : डॉक्टरांची अपॉईंटमेंट सोडून मुलाच्या भेटीसाठी आल्या, रोहित शर्माची आईसोबत भेट पाहून डोळे पाणावतील!
रोहित शर्मा अनेक दिवसांपासून घराबाहेर होता. 2024 मधील टी20 वर्ल्ड कप चँपियन बनण्यासाठी तो जवळपास महिनाभर न्यूयॉर्क आणि वेस्ट इंडिजमध्ये होता. वर्ल्ड कपवर नाव कोरून जेव्हा तो भारतीय संघासोबत मायदेशी परतला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी लाखो फॅन्स मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते. त्याचवेळी रोहितची आई देखील तिथे होती. आपल्या मुलाला मिळणार अपरिमित प्रेम पाहून त्यांना भरून आलं.
मुंबईचा लाडका, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये अंतिम सामना जिंकू टी20 वर्ल्ड कप वर नाव कोरलं. टीम इंडियाचा विजय झाल्यापासूनच संपूर्ण देश त्यांची वाट पहात होता. 4 जुलैला भारतीय संघ मायदेशी परतला तेव्हा प्रथम दिल्लीत आणि नंतर मुंबईत लाखो चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. रोहित शर्मा आपल्या संघासह विश्वविजेता बनण्यासाठी एका महिन्याहून अधिक काळ देशाबाहेर राहिला होता. इतके दिवस तो आई बाबांपासून दूर राहिला. त्यामुळ वर्ल्डकप जिंकून जेव्हा तो मुंबईत आला, तेव्हा त्याच्या आईने अनेक दिवसांनी त्याला पाहिले. रोहितला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तेव्हाच त्याच्या आईने आपल्या लाडक्या लेकाना मिठा मारत, गालावार, कपाळावर किस केलं. यावेळी त्याचे वडीलही उपस्थित होते.
डॉक्टरांची अपॉईंटमेंट सोडून आल्या
प्रत्येक भारतीयाप्रमाणे 4 जुलै हा दिवस रोहित शर्माच्या पालकांसाठी अभिमानाने भरलेला होता. अखेर त्यांचा मुलगा वर्ल्ड चॅम्पियन बनून परतला आणि संपूर्ण देश त्याला सलाम करत होता. या दोघांनीही अनेक दिवस आपल्या मुलाला पाहिले नव्हते. त्यामुळे तेही मुलाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोहितची आई पूर्णिमा शर्मा यांनी सांगितले की, त्याची तब्येत ठीक नाही आणि डॉक्टरांची अपॉईंटमेंट ठरली होती. पण त्यांना आपल्या मुलाचा खास क्षण, त्याचं होणारं कौतुक चुकवायचं नव्हतं. शर्मा कुटुंबीय बऱ्याच दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते. त्यामुळे या आनंदात सामील होण्यासाठी पूर्णिमा शर्मा या स्टेडियमवर आल्या होत्या. वर्ल्डकपला जाण्यापूर्वी असा दिवस बघायला मिळेल असा विचारही केला नव्हता, असे रोहितच्या आईने सांगितले.
View this post on Instagram
आईसमोर सांगितला होता रिटायरमेंट प्लान
या मुलाखतीत रोहित शर्माच्या आईने आणखी एक खुलासा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने जाण्यापूर्वीच सांगितले होते की, त्याला वर्ल्ड कपनंतर टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घ्यायची आहे. विजयी होऊन परत ये असा आशीर्वाद त्याच्या आीने यावेळी त्याला दिला. आपल्या मुलाला इतकं प्रेम मिळतंय हे पाहून रोहितच्या आईचा विश्वास बसत नव्हता. असे वातावरण आजपर्यंत कधीच पाहिले नाही, हे सर्व रोहितच्या मेहनतीचे फळ असल्याचे त्यांनी नमूद केलं.