मेलबर्न : कालच्या सामन्यात टीम इंडियाचा (IND) आफ्रिकेने (SA) पराभव केला. अनेकदा चुकीची फिल्डींग झाल्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांच्या काल रिएक्शन सारख्या होत्या. त्यामुळे दोघेही कालपासून अधिक चर्चेत आहेत. काल दोघांनी चुकीची फिल्डींग केली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Reaction of Virat Kohli when Rohit Sharma missed run out
Reaction of Rohit Sharma when Virat Kohli dropped catch ?? pic.twitter.com/LxfS83deJp
कालच्या मॅचमध्ये आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. टीम इंडियाचा सुर्यकुमार यादव हा एकमेव फलंदाज होता. ज्याने आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली.कालच्या मॅचमध्ये त्याने 40 चेंडूत 68 धावा केल्या.
Virat Kohli drops a sitter.
Rohit Sharma misses easy run out chance.
टीम इंडियाच्या खेळाडूंना काल मोठी खेळी करता आली नाही. आफ्रिकेची सुरुवात देखील अधिक चांगली झाली नव्हती. त्यांच्या सुद्धा सुरुवातीला महत्त्वाच्या विकेट गेल्या होत्या. डेविड मिलरने 59 धावांची चांगली खेळी केली. त्यामुळे आफ्रिकेची टीम विजयी झाली.
काल ज्यावेळी विराट कोहलीकडून एक कॅच सुटली, त्यावेळी रोहित शर्माची निराश चेहऱ्याने एक रिएक्शन दिली. नंतर रोहित शर्माकडून रण आऊटचा चान्स हुकला त्यावेळी विराट कोहलीने एक रिएक्शन दिली. दोघांच्या रिएक्शन सारख्या असल्यामुळे दोघंही कालपासून चर्चेत आहेत.