Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : बंगळुरुची लायकी नाही, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची घणाघाती टीका

दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतरही बंगळुरुने प्ले ऑफ फेरीत धडक मारली आहे.

IPL 2020 : बंगळुरुची लायकी नाही, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची घणाघाती टीका
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 7:42 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील लीग फेरीतील अंतिम सामना आज (3 नोव्हेंबर) खेळण्यात येणार आहे. हा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याच्या निकालावरुन प्ले ऑफमधील चौथा संघ ठरणार आहे. दिल्ली विरुद्ध बंगळुरु यांच्यात 2 नोव्हेंबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात दिल्लीने बंगळुरुवर 6 विकेट्सने मात केली. या सामन्यानंतर दिल्ली प्ले ऑफ फेरी गाठणारी दुसरी टीम ठरली. तर पराभवानंतरही बंगळरुने प्ले ऑफमध्ये धडक मारली. यामुळे बंगळुरुने प्ले ऑफमधील तिसरं स्थान नक्की केलं. मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरुची आयपीएल विजेतेपद पटकावण्याची लायकी नाही, अशी घणाघाती टीका इंग्लंडचा माजी कर्णधार (Michael Vaughan) मायकल वॉनने केली आहे. Bangalore do not deserve to win IPL title, criticizes former England captain Michael Vaughan

“बंगळुरुत दम नाही”

“बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे बंगळुरुला आयपीएल जितेपद पटकावण्यासाठी सलग 3 सामने जिंकावे लागतील. मात्र बंगळुरुत सलग 3 सामने जिंकून विजेतेपद पटकावण्याची क्षमता नाही, असं मायकल वॉन म्हणाला. बंगळुरुची आयपीएल स्पर्धा जिंकण्याची क्षमता नाही, हे मी आधीही म्हणालो होतो. मात्र 2020 या वर्षात काहीही शक्य आहे. या वर्षी जगात अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. त्यामुळे कधी काय होईल, सांगता येत नाही. विराटने डाव्या हाताने बॅटिंग केली तरी, बंगळुरु जिंकेल”, अशी उपरोधिक टीकाही मायकलने केली.

दबावात्मक परिस्थतीत खेळणाऱ्यांची संख्या कमी

“बंगळुरुने साखळी फेरीतील मागील 4 सामने सलग गमावले आहेत. बंगळुरुमध्ये निर्णायक आणि दबावात्मक स्थितीत चांगली खेळी करणाऱ्या खेळाडूंची कमतरता आहे. त्यामुळे बंगळुरुला दबावात्मक परिस्थितीत सलग 3 सामने जिंकून देणाऱ्या खेळाडूंची कमतरता आहे. त्यामुळे बंगळुरुपुढे आक्रमक तसेच निडरपणे खेळण्याशिवाय पर्याय नाही. बंगळुरुला पुढील सामन्यात सकारात्मक दृष्टीनेच मैदानात उतरावे लागेल”, असंही वॉर्नने म्हटलं.

बंगळुरु एलिमिनेटर खेळणार

बंगळुरु शुक्रवारी एलिमिनेटर सामना खेळणार आहे. या सामन्यात बंगळुरुला सनरायजर्स हैदराबाद किंवा कोलाकाता नाईट रायडर्सचे आव्हान असेल. हैदराबाद विरुद्ध मुंबई या सामन्यानंतर प्ले ऑफमधील चौथ्या क्रमांकाची टीम ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL प्लेऑफचं गणित : मुंबईच्या विजयाकडे कोलकात्याचं लक्ष, हैदराबादसाठी ‘करो या मरो’ची स्थिती

India Tour Australia | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? सौरभ गांगुली म्हणतो…

IPL 2020, SRH vs MI Live : सनरायजर्स हैदराबादचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय

Bangalore do not deserve to win IPL title, criticizes former England captain Michael Vaughan

‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान.
पुण्यात घडलं तेच कल्याणमध्ये? महापालिका रूग्णालयात गर्भवतीचा मृत्यू अन
पुण्यात घडलं तेच कल्याणमध्ये? महापालिका रूग्णालयात गर्भवतीचा मृत्यू अन.
.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले
.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले.