RR vs CSK : 18 कोटीचा खेळाडू आपल्याच पायावर मारतोय कुऱ्हाड, अशाने टीम इंडियात कशी मिळेल जागा?

| Updated on: Mar 31, 2025 | 8:59 AM

RR vs CSK : मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर 18 कोटी रुपये खर्च करुन पुढच्या तीन वर्षांसाठी त्याला आपल्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. नव्या सीजनमध्ये टीमला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत.

RR vs CSK : 18 कोटीचा खेळाडू आपल्याच पायावर मारतोय कुऱ्हाड, अशाने टीम इंडियात कशी मिळेल जागा?
RR Players
Image Credit source: PTI
Follow us on

आयपीएलचा नवीन सीजन काही मोठ्या खेळाडूंसाठी अजूनही चांगला ठरलेला नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, स्टार पेसर मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, ऋषभ पंत या खेळाडूंना अजूनही छाप उमटवता आलेली नाही. त्यांच्या अपयशाची चर्चा आहे. टीम इंडियाचा अजून एक प्लेयर आहे, ज्याच्यासाठी हा सीजन खूप महत्त्वाचा आहे, पण अजून त्याला सूर गवसलेला नाही. हा आहे, राजस्थान रॉयल्सचा युवा ओपनर यशस्वी जैस्वाल. त्याला फ्रेंचायजीने रिटेन केलं आहे. आयपीएल 2025 च्या तिन्ही सामन्यात तो फेल ठरलाय.

मागच्या दोन सीजनमध्ये यशस्वी जैस्वालने स्फोटक फलंदाजी करुन सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. त्याचा हाच फॉर्म पाहून राजस्थान रॉयल्सने त्याला रिटेन केलं होतं. यशस्वी जैस्वालकडे टीम इंडियाच भविष्य म्हणून पाहिलं जातं. मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर 18 कोटी रुपये खर्च करुन पुढच्या तीन वर्षांसाठी त्याला आपल्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. नव्या सीजनमध्ये टीमला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत.

सलग तिसऱ्या सामन्यात तो अपयशी

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सीजनच्या तिसऱ्या सामन्यात जैस्वालकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. या सीजनमध्ये चेन्नईचा बॉलिंग अटॅक तितका दमदार वाटत नव्हता. यशस्वीने पहिल्या चेंडूवर चौकार मारुन शानदार सुरुवात केली. पण तिसऱ्याच चेंडूवर आऊट होऊन त्याने पॅव्हेलियनची वाट धरली. सलग तिसऱ्या सामन्यात तो अपयशी ठरला. 3 इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून 34 धावा निघाल्या. यात केकेआर विरुद्ध 29 धावा मोठा स्कोर आहे.

पुनरागमन कठीण होऊ शकतं

जैस्वालचा हा फॉर्म चांगले संकेत नाहीयत. अजूनपर्यंत त्याला फक्त तीनदाच बॅटिंगची संधी मिळालीय. अजून 11 इनिंग बाकी आहेत. जैस्वालकडे पुनरागमनासाठी वेळ आहे. या सीजनमध्ये त्याची बॅट चालली नाही, तर यशस्वीच टीम इंडियात पुनरागमन कठीण होऊ शकतं. टेस्ट टीममध्ये जैस्वालची जागा पक्की आहे. वनडेमध्ये त्याने डेब्यु केलाय. या फॉर्मेटमध्ये अजून त्याला बऱ्याच संधींची प्रतिक्षा आहे. टी 20 मध्ये त्यांचं पुनरागमन अडचणीत येऊ शकतं. यशस्वी जैस्वाल मूळचा मुंबईकर आहे. तो स्थानिक स्पर्धांमध्ये मुंबईकडून खेळतो.

त्याची कोणाशी स्पर्धा?

सातत्याने टेस्ट क्रिकेट खेळणारा यशस्वी जैस्वाल मागच्या आठ-नऊ महिन्यात टीम इंडियासाठी एकही T20 सामना खेळला नाहीय. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनल यांनी आपल्या तुफानी बॅटिंगने ओपनिंग स्लॉटची जागा पक्की केलीय. शुभमन गिल, साई सुदर्शन आणि इशान किशन यांनी धावा करुन आपली दावेदारी सादर केलीय. अशावेळा यशस्वी जैस्वालला टीम इंडियाच्या T20 संघात स्थान मिळवायचं असेल, तर धावा बनवाव्या लागतील.